शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक सुवर्णासाठी फिटनेस व सातत्य हवे : सायना

By admin | Updated: September 2, 2015 23:43 IST

भारतीय बॅडमिंटनची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायनाला

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटनची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायनाला आता रियो आॅलिम्पिकचे सुवर्ण जिंकण्याचे वेध लागले आहेत. पण, त्यासाठी फिटनेस आणि खेळातील सातत्य टिकविण्याची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले. बुधवारी येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेली सायना म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकचे कास्य आणि विश्व स्पर्धेचे रौप्य जिंकल्यानंतर माझे लक्ष्य रियो आॅलिम्पिकचे सुवर्ण असेल. पण, त्यासाठी सध्याचा फॉर्म वर्षभर कायम राखण्याचे अवघड आव्हान आहे. फॉर्ममधील सातत्याश्विाय मला माझ्या फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागेल. जेतेपद मिळविण्यासाठी शंभर टक्के फिटनेसची गरज असते. त्यासाठी कठोर सराव आणि फिटनेस ट्रेनिंग सुरू आहे. पुढील वर्षीच्या रियो आॅलिम्पिकपर्यंत जखमांपासून दूर राहण्याची अपेक्षा बाळगून आहे.’’कारकिर्दीचा सुवर्णकाळ...सध्या माझ्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू असल्याची कबुली देत सायना म्हणाली, ‘‘यंदा मी इंडियन ओपन आणि सय्यद मोदी ग्रॅन्ड प्रिक्स जिंकले. आॅल इंग्लंड आणि विश्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. शिवाय अव्वल स्थानही गाठले. एखाद्या खेळाडूसाठी यापेक्ष़ा मोठी कामगिरी काय असू शकेल?हैदराबादपेक्षा बंगळुरू लाभदायी...सराव हैदराबादहून बंगळुरूला हलविल्यामुळे लाभ झाल्याचे सांगून सायना म्हणाली, ‘‘हैदराबादमध्ये ग्रुप ट्रेंिनंगमुळे माझा खेळ प्रभावित व्हायचा. मी विमल सरांशी बोलले आणि वैयक्तिक सराव सुरू केला. त्यांनी फोकस केल्यामुळे माझ्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली. परिणाम पुढे आहे. गेल्या पाच वर्षांत विश्व स्पर्धेत क्वॉर्टरफायनलपुढे सरकत नव्हते. यंदा अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे मागच्या आॅलिम्पिकमध्ये मी कास्य जिंकले होते. पुढच्या वर्षी रियोमध्ये मोठे स्वप्न उराशी बाळगून खेळणार आहे. चीनच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढण्यात मी यशस्वी होऊ शकले. आता स्पेनच्या खेळाडूंचे आव्हान आहे. स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन हिलादेखील पराभूत करण्यात यशस्वी होईन, अशी मला खात्री आहे.’’ सायना नंबर वन, तर मारिन नंबर टू आहे, हे विशेष.रियो आॅलिम्पिकमध्ये चीनकडून अनपेक्षितपणे दुसऱ्याच खेळाडूची एन्ट्री झाल्यास काय डावपेच असतील, यावर सायना म्हणाली, की अशी शक्यता कमी आहे, पण पहिल्या फेरीत मला सावध राहावे लागेल. (वृत्तसंस्था)