शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पहिली कसोटी : श्रीलंकेचे पारडे जड २६८ धावांचे लक्ष्य, आॅस्ट्रेलिया ३ बाद ८३ धावा

By admin | Updated: July 29, 2016 19:20 IST

श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध दडपणाखाली दिसत असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाने २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज, शुक्रवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन विकेट झटपट गमावल्या.

ऑनलाइन लोकमतपल्लेकेल, दि. २९ :श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध दडपणाखाली दिसत असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाने २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज, शुक्रवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन विकेट झटपट गमावल्या. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंका संघाने चौथ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले आहे. चौथ्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ३ बाद ८३ अशी अवस्था होती. त्यावेळी कर्णधार स्टिव्ह स्मिथ २६ धावा काढून खेळपट्टीवर होता.जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी १८५ धावांची गरज असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. आॅस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्याच षटकात रंगाना हेराथने उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला (१) क्लीनबोल्ड करीत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले.

उस्मान ख्वाजाने तीन चौकार लगावले, पण आॅफ स्पिनर दिलरुवान परेराच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका खेळण्याच्या नाबाद विकेट गमावली. त्यावेळी आॅस्ट्रेलियाची २ बाद ३३ अशी अवस्था होती. त्यानंतर एस. लक्षणने सलामीवीर जो बर्न्स (२९) याला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर धावसंख्येत एका धावेची भर पडली असता पहिल्या डावात सर्वाधिक धावा फटकावणार अ‍ॅडमव्होजेसला (०) परेराने पायचित केले, पण रिव्हूमध्ये निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला.

चेंडू वळत असल्यामुळे स्मिथ व व्होजेस यांना फटके खेळण्यासाठी अडचण भासत होती. त्यामुळे धावगती संथ होती. स्मिथने ५४ चेंडूंना सामोरे जाताना एकही चौकार ठोकलेला नाही तर व्होजेस २५ चेंडूंना सामोरे जात ९ धावा काढून नाबाद आहे.त्याआधी, श्रीलंकेतर्फे दुसऱ्या डावात कुशाल मेंडिसने शानदार शतकी खेळी केली. मेंडिसचा अपवाद वगळता उभय संघातील एकाही खेळाडूला अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. सकळी वैयक्तिक १६९ धावसंख्येवरून पुढे खेळताना मेंडिसला आज केवळ ७ धावांची भर घालता आली. मिशेल स्टार्कने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. स्टार्कने ८४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. हेराथ व नुवान प्रदीप यांनी अखेरच्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३५३ धावांची मजल मारली.