शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

सर्वप्रथम आॅलिम्पिक पात्रता गाठावी

By admin | Updated: December 31, 2015 01:54 IST

२०१२च्या आॅलिम्पिकमध्ये मिळालेले बॅडमिंटनमधील पदक हे माझ्यामते भारतीय बॅडमिंटनसाठी सर्वात मोठे यश होते. आता आगामी आॅलिम्पिकसाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याचे लक्ष्य गाठावे

मुंबई : २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये मिळालेले बॅडमिंटनमधील पदक हे माझ्यामते भारतीय बॅडमिंटनसाठी सर्वात मोठे यश होते. आता आगामी आॅलिम्पिकसाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याचे लक्ष्य गाठावे आणि त्यानंतर पुढील तयारी करता येईल, असे भारताचे दिग्गज माजी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.२ जानेवारीपासून रंगणाऱ्या बॅडमिंटन लीग ‘पीबीएल’ स्पर्धेतील मुंबई रॉकेट्स संघाच्या लोगोचे अनावरण करताना गोपीचंद यांनी आपली प्रतिक्रीया दिली. या कार्यक्रमाला युवा खेळाडू आरएमव्ही गुसाईदत्त, भारताचा अनुभवी खेळाडू एच.एस. प्रणॉय आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या डेन्मार्कचा दुहेरीचा खेळाडू मॅथीअस बोए यांची उपस्थिती होती. यावेळी गोपीचंद म्हणाले की, ओलिम्पिक तयारी विषयी म्हणायचे झाल्यास, सर्वप्रथम आपल्याला ‘स्टेप बाय स्टेप’ पुढे जाणे गरजेचे आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंनी आॅलिम्पिक पात्रता गाठणे महत्त्वाचे असून ते आपले पहिले लक्ष्य आहे. जर का प्रमुख खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्यास नश्चितच यंदा भारताला बॅडमिंटनमध्ये पदकांची संधी असेल. यंदाच्या पीबीएलमध्ये ट्रम्प सामना सर्वांचे लक्ष वेधून घेणार ठरेल. याविषयी गोपीचंद यांनी सांगितले की, स्पर्धेत हा प्रयोग निश्चित चांगला प्रयत्न आहे. यामुळे सामन्यात शेवटपर्यंत रोमांचकता राहिल. प्रत्येक संघाला आपल्या सामन्यातील पाच लढतींपुर्वी एक लढत ट्रम्प म्हणून घोषित करावी लागेल. सामन्याच्या दिड तास आधी प्रत्येक संघाला आपल्या रुपरेषेला अंतिम स्वरुप द्यावे लागेल. त्यावेळी त्या संघाला आपल्या ट्रम्प लढतीची माहिती द्यावी लागेल. ट्रम्प लढत जिंकल्यास त्या संघाला अतिरीक्त गुण मिळतील, तर हरल्यास एक गुण कमी होईल.