मुंबई : ड्रॅग रेसींग शर्यतीत एम १ या प्रकारात तूम्मी ननावरेच्या अफलातुन वेगाने बाजी मारली आहे. त्याचवेळी रेहाना हाजी मोहम्मद आणि लोकेश ठाकुर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा करुन दोन दिवसीय मोटरबाईक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपली छाप पाडली. फेडरेशन आॅफ मोटर स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया (एफएमएससीआय) यांच्या मान्यतेने वसईतील यशवंत स्मार्ट सिटीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीमध्ये टुमीने वेगासह बाईक वर योग्य संतुलन साधत विजेतेपद पटकावले. हा पल्ला केवळ १५.८८१ सेंकदात पार करुन त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सहजपणे मागे टाकले. दुसऱ्या स्थानासाठी रेहाना ने १६.२०८ सेंकदाचा वेळ घेतला. तसेच १६.२३१ सेंकदासह लोकेशला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
ननावरेची पहिल्या दिवशी बाजी
By admin | Updated: June 7, 2015 00:42 IST