ऑनलाइन लोकमतविशाखापट्टणम, दि. १७ : अखेरच्या स्थानावर असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स संघाने दिल्लीविरुद्ध नाणएफेकीचा कौल जिंकून प्रथम गोंलजदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्याची आशा कायम राखण्यासाठी आज खेळल्या जाणाऱ्या लढतीत अखेरच्या स्थानावर असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायन्ट्सविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरेल. दिल्ली संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी संमिश्र ठरली आहे. संघाला उर्वरित तीन सामन्यांत कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. दिल्ली संघाने ११ सामन्यांत ६ सहा विजय मिळवताना १२ गुणांची कमाई केली आहे. दिल्ली संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. अखेरच्या तीन सामन्यांत दिल्ली विजय मिळवण्यास उत्सुक आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता पुणे संघासाठी यंदाचे सत्र निराशाजनक ठरले. पुणे संघ यापूर्वीच प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ उर्वरित सामन्यांत विजय मिळवत मोसमाचा सकारात्मक शेवट करण्यास प्रयत्नशील आहे. रविवारी डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली संघाला मुंबई इंडियन्सने कृणाल पंड्याच्या (८६ धावा, ३७ चेंडू) आक्रमक खेळीच्या जोरावर पराभूत केले. दिल्ली संघाचा कर्णधार झहीर खानने गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करताना आतापर्यंत ९ बळी घेतले आहे. मुंबईविरुद्धच्या पराभवादरम्यानही त्याचा इकॉनॉमी रेट सर्वांत चांगला होता. त्याने चार षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. दिल्ली संघाची फलंदाजीमध्ये भिस्त क्विंटन डिकाक, संजू सॅमसन आणि करुण नायर यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. संघव्यवस्थापनाला आगामी लढतींमध्ये यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. पुणे संघाला अजिंक्य रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रहाणेला अन्य फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे. कर्णधार धोनीलाही अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सौरभ तिवारी आणि अष्टपैलू तिसारा परेरा यांनी काही लढतींमध्ये उपयुक्त योगदान दिले आहे, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीमध्ये पुणे संघाची कामगिरी निराशाजनक आहे. आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम जम्पाने सनराजयझर्स हैदराबादविरुद्ध सहा बळी घेण्याचा अपवाद वगळता पुणे संघाच्या गोलंदाजांनी निराश केले आहे. रविचंद्रन अश्विन व मुरुगन अश्विन या फिरकीपटूंच्या जोडीला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. वेगवान गोलंदाज डिंडा व परेरा यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात अपयश आले. >प्रतिस्पर्धी संघदिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), मयंक अग्रवाल, खलील अहमद, सॅम बिलिंग्स, ब्रेथवेट, नॅथन कूल्टर नाइल, डिकाक, ड्युमिनी, अखिल हर्वेडकर, इम्रान ताहिर, श्रेयस अय्यर, महिपाल लोमरोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, मॉरिस, शाहबाज नदीम, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, प्रत्युष सिंग, संजू सॅम्सन, पवन सुयाल, जयंत यादव. ाुणे रायजिंग सुपरजायन्ट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, उस्मान ख्वाजा, जॉर्ज बेली, रविचंद्रन अश्विन, सौरभ तिवारी, तिसारा परेरा, रजत भाटिया, अॅडम जम्पा, अशोक डिंडा, आर.पी. सिंग, मुरुगन अश्विन, बाबा अपराजित, अंकित शर्मा, अंकुश बैस, दीपक चाहर, स्कॉट बोलँड, पीटर हँडस्काम्ब, जसकरण सिंग, एल्बी मोर्कल, ईश्वर पांडे, इरफान पठान आणि ईशांत शर्मा.
नाणेफेक जिंकूण पुण्याची प्रथम गोंलदाजी
By admin | Updated: May 17, 2016 19:37 IST