भुवनेश्वर : भारताविरुद्ध शनिवारी उपांत्य फेरीत मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटाने अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली व मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आले.पाकिस्तानच्या खेळाडूंनी चाहत्यांसोबत गैरवर्तन करताना असभ्य इशारे केले. त्यामुळे पुढील वर्षी मार्च महिन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध आयोजित द्विपक्षीय मालिकेत हॉकी इंडियाने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या तीव्र प्रतिक्रियेची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला (एचआयएच) दखल घेणे भाग पडले. या दोघांना आता जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळता आले नाही.