शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध चांगल्या कामगिरीवर भर

By admin | Updated: May 27, 2017 00:30 IST

‘जिद्द आणि विश्वास यांची सांगड घालून जग जिंकता येते’ हा संवाद यवतमाळच्या आकाश चिकटे याने खरा ठरविला आहे.

नवी दिल्ली : ‘जिद्द आणि विश्वास यांची सांगड घालून जग जिंकता येते’ हा संवाद यवतमाळच्या आकाश चिकटे याने खरा ठरविला आहे. ग्रामीण भागातील खेळाडू ते भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकिपर असा प्रवास करणाऱ्या आकाशने वर्षभरात जो अनुभव संपादन केला त्याबळावर तो जगातील सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.मागच्या वर्षी मलेशियातील सुल्तान अझलन शाह हॉकी कपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून शानदार कामगिरी करीत असलेला युवा आकाश या खेळात नावारुपास आला. मागच्यावर्षी तो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा राखीव गोलकिपर होता. पी. आर. श्रीजेश जखमी होताच आकाशला संधी मिळताच त्याचे त्याने सोने केले. मलेशियाविरुद्ध भारताच्या २-१ ने मिळविलेल्या विजयात आकाशची भूमिका मोलाची ठरली होती. भारताने चॅम्पियन्स पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये ३-२ ने विजय मिळवित स्पर्धा जिंकली. या सामन्यात पाकचे अनेक हल्ले आकाशने शिताफीने परतवून लावले. यंदा देखील सुल्तान अझलन शाह चषकात श्रीजेश जखमी झाल्याने संघाबाहेर पडला. लगेचच चिकटेने जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत भारताने कांस्य पदक जिंकले होते. मागच्यावर्षीच्या तुलनेत माझ्या कामगिरीत लक्षनीय सुधारणा झाल्याचे अकाशचे मत आहे. बंगलोर येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणात सुरू असलेल्या भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरात आकाश गोलकिपिंगमध्ये घाम गाळत आहे. सराव सत्रानंतर तो म्हणाला, ‘देशासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यापासून गोलकिपिंगमध्ये बरीच सुधारणा करावी लागेल याचे संकेत मिळाले. याची सुरुवात मी आत्मविश्वास वाढविण्यापासून केली. याआधी मी ज्युनियर भारतीय शिबिरातही भाग घेतला नव्हता. मला थेट सिनियर स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. मला बेसिक्स भक्कम करावे लागतील याची जाणीव होती. मी बेसिक्सवर लक्ष देत उणिवा दूर केल्यामुळेच या स्तरावर पोहोचू शकलो.’ (वृत्तसंस्था)