हैदराबाद : भारताचे दोन अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यातील ‘हायव्होल्टेज’ सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बॅडमिंटनप्रेमी सज्ज झाले होते. मात्र हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर न खेळल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. हे चित्र होते पीबीएलमधील अवध वॉरिअर्स विरुद्ध चेन्नई स्मॅशर्स सामन्यातील.सायना - सिंधू या धमाकेदार लढतीच्या अपेक्षेने स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने सोमवारी प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती. मात्र या सामन्यासाठी सायना कोर्टवरच न उतरल्याने बॅडमिंटनप्रेमींचा हिरमोड झाला. सायनाच्या जागी कोर्टवर उतरलेल्या वृषाली गुम्मडीला बलाढ्य सिंधूने १५-७, १५-३ असे सहजपणे लोळवले. (वृत्तसंस्था)
...अखेर हिरमोड झाला
By admin | Updated: January 13, 2016 03:54 IST