शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात होणार फायनल

By admin | Updated: March 28, 2017 01:17 IST

देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वसंग्रामाची जंगी फायनल कोलकात्यात रंगणार आहे

पणजी : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वसंग्रामाची जंगी फायनल कोलकात्यात रंगणार आहे. नवी मुंबई आणि गुवाहाटी या केंद्रांना सेमीफायनलसाठी निवडण्यात आले आहे. मडगाव (गोवा) हे ‘क’ गटातील सामन्यांचे स्थानिक मैदान असेल. याबरोबरच ‘राउंड १६’ मधील दोन सामने आणि एक उपांत्यपूर्व सामनाही येथे होईल. कोची हे ‘ड’ गटातील सामन्यांचे केंद्र असून येथे एक उपांत्यपूर्व लढत होईल. ‘फिफा’चे शिष्टमंडळ सध्या भारतात असून, त्यांनी देशातील सहा केंद्रांची पाहणी केली. शिष्टमंडळाचे प्रमुख जेमी यार्जा यांनी सोमवारी ही घोषणा केली. या विश्वसंग्रामातील सामने कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, मडगाव, कोची आणि नवी मुंबई येथे होतील. तब्बल ८५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले विवेकानंद युवा भारती क्रीडांगण कोलकाता हे तिसऱ्या स्थानाच्या प्ले आॅफ मॅचसाठी निवडण्यात आले. येथे ‘फ’ गटातील सहा सामने होतील. या मैदानास कोटी रुपये खर्च करून नवे रूप देण्यात आले आहे. उपांत्य सामन्यांसाठी मुंबई येथील डी.वाय. पाटील आणि गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमची निवड करण्यात आली. डी.वाय. पाटील मैदान हे ‘अ’ गटाचे स्थानिक मैदान असेल. गुवाहाटी हे ‘ई’ गटाचे केंद्र असून येथे ‘राउंड १६’ सामने आणि एक उपांत्य सामना होईल. स्पर्धेचा ‘ड्रॉ’ ७ जुलैला होईल. (वृत्तसंस्था)म्हणून कोलकात्याची निवड...भारतात होणारी ही एक स्पर्धा नसून हा फुटबॉल महोत्सव आहे. आॅक्टोबर हा उत्साहाचा महिना असल्याने आम्ही त्याला महोत्सवाचे रूप देणार आहोत. आम्हाला डी.वाय. पाटील स्टेडियम पसंत आहे; परंतु सॉल्ट लेक स्टेडियमवर जे आम्ही पाहिले ते आमच्या नजरेत अधिक उतरले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, कोलकात्यातील या स्टेडियमवर होणारा अंतिम सामना यादगार असा असेल, फिफा शिष्टमंडळ प्रमुख यार्जा यांनी सांगितले.