शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा

By admin | Updated: July 14, 2017 17:30 IST

श्रीलंकेचे दोन महान क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा यांच्यात सध्या शाब्दीक लढाई जुंपली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 14 - श्रीलंकेचे दोन महान क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा यांच्यात सध्या शाब्दीक लढाई जुंपली असून, दोघांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात संशय निर्माण होतील असे गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 2011 वर्ल्डकपचा  भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला अंतिम सामना फिक्स होता. या मॅचची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अर्जुन रणतुंगा यांनी केली आहे.  53 वर्षीय रणतुंगा सध्या श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री आहेत. 
 
त्याचवेळी कुमार संगकाराने 2009 चा श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा कोणाच्या सांगण्यावरुन ठरवण्यात आला होता त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2009 सालच्या पाकिस्तान दौ-यात श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सकाळच्या समयी खेळाडू बसने स्टेडियमकडे निघाले असताना दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये सहा पाकिस्तान पोलीस ठार झाले तर, काही खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर कुठल्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. 
 
आणखी वाचा 
बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
ख्रिस गेलनं भारतात खरेदी केली कंपनी
सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील
 
त्याचवेळी रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले. 
 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली खेळणा-या  श्रीलंकेच्या संघाने  अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. महेला जयवर्धनेच्या नाबाद (103) धावांच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य दिले. गौतम गंभीरच्या (97) आणि महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद (91) धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केले.