शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्धची लढत आमच्यासाठी फायनलच!

By admin | Updated: April 27, 2017 00:44 IST

याया टौरीहा ‘मिडफिल्डर’ मॅन्चेस्टर सिटीकडून गेल्या २०१० पासून खेळत आहे. संघासाठी त्याचे योगदान अमूल्य असे आहे; परंतु गुरुवारी

याया टौरी याच्याशी केलेली बातचीत....याया टौरीहा ‘मिडफिल्डर’ मॅन्चेस्टर सिटीकडून गेल्या २०१० पासून खेळत आहे. संघासाठी त्याचे योगदान अमूल्य असे आहे; परंतु गुरुवारी इथियाड येथे मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्ध होणारी त्यांची लढत ही एका अंतिम सामन्याप्रमाणेच असेल. या मोठ्या ‘डर्बी’त कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता लागली आहे; कारण प्रीमिअर लीग स्पर्धेत टॉप-४ मध्ये स्थान मिळविण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करीत आहेत. आता केवळ सहा सामने शिल्लक आहेत. मॅन्चेस्टर सिटी हा संघ चौथ्या तर मॅन्चेस्टर युनायटेड त्यांच्या एका स्थानाने मागे आहे. आयव्हरी कोस्टचा ‘स्टार’ याया टौरी संघाला मोठा विजय मिळवून देण्याचा प्रयत्नात आहे. त्यालाही हा सामना म्हणजे ‘फायनल’ असल्याचे भासत आहे. सामन्यापूर्वी त्याच्याशी साधलेला हा संवाद...टॉप चार संघांत स्थान मिळविण्यासाठी गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढत होत आहे. या लढतीविषयी मॅन्चेस्टर सिटीच्या गोटात काहीसे भीतीचे वातावरणही असेल. याबाबत तुला काय वाटते?पुढे काय होईल हे सागू शकत नाही. मॅन्चेस्टर युनायटेडविरुद्धचा सामना नेहमीच विशेष असाच राहिला आहे; पण या वेळी तो अधिक महत्त्वाचा वाटतो. माझ्यासाठी हा सामना एक ‘फायनल’ असेल.सिटीच्या खेळाडंूसाठी कोणता संदेश देशील?गेल्या सहा वर्षांपासून सिटी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे गुरुवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळाडूंना हेच सांगेन की, चॅम्पियन्स लीगचा पुरस्कारमिळवायचा असेल तर पुनरागमन करीत जबरदस्त खेळ करावा लागेल.पॉल पोग्मा हा तुझा जवळचा मित्र. तू दुखापतग्रस्त झाला. त्याबाबत..तो उत्तम खेळाडू आहे. त्याच्याबाबत मी थोडा नाराज आहे; कारण तो मॅन्चेस्टर सिटीकडून खेळावा, अशी माझी इच्छा होती. त्याच्याशी मी बोललोही होतो. आता त्याच्याविरुद्ध खेळावे लागत आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. तो खेळाचा चांगला आनंद लुटतो.२०१० पासून तू सिटीकडून खेळत आहे. त्यामुळे तुला या सामन्याचे महत्त्व काय हे चांगले माहीत आहे. त्याबद्दल काय सांगशाील?निश्चितच, प्रत्येकासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे, याची मला जाण आहे. हा मोठा सामना आहे. यात खेळण्याची मलाही खूप उत्सुकता आहे. आम्ही खूप आनंद घेणार आणि जिंकणारसुद्धा. गेल्या आॅक्टोबरपासून युनायटेडने पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ही चांगली टक्कर असेल, असे वाटत नाही?माहीत आहे. त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. आमच्यासाठी संघर्ष असेल. २२ दिग्गज खेळाडू मैदानावर असतील. जुझे मॉरिन्होसारखा दिग्गज व्यवस्थापकही मैदानावर असेल. ही एक मोठी लढाई असेल. एफए चषकानंतर पुनरागमन करण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आम्हाला विजय हवाय. टॉप-३ गाठण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानुसार झुंजावे लागणार याची कल्पना आहे. एफए चषकात आर्सेनलकडून पराभूत झाल्यानंतर खेळाडूंची मनस्थिती कशी होती? मानसिकरीत्या ते यातून सावरले आहेत?हो...आर्सेनलविरुद्धच्या पराभवाला रेफ्रीचे चुकीचे निर्णयसुद्धा कारणीभूत आहेत; पण फुटबॉलमध्ये या गोष्टी होतात. कधी कधी सगळे काही तुमच्याविरुद्ध घडत असते. ते स्वीकारून पुढे जाणे हेच तुमच्यासाठी फायद्याचे असते. आम्ही जर युनायटेडविरुद्ध जिंकलो तर आम्ही आर्सेनलविरुद्धच्या पराभवाच्या कटू आठवणी विसरणार. पराभूत झालो तर आमच्यासाठी अधिक कठीण होईल. (पीएमजी)