शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फिफा युवा विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा सज्ज : सेप्पी

By admin | Updated: February 18, 2017 01:02 IST

२०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसारखी अखेरच्या क्षणी नाचक्की होऊ नये याची काळजी घेत १७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक

नवी दिल्ली : २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसारखी अखेरच्या क्षणी नाचक्की होऊ नये याची काळजी घेत १७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी आधीच सज्ज करण्यात आल्याची माहिती स्थानिक आयोजन समितीचे संचालक झेव्हियर सेप्पी यांनी दिली आहे.या आयोजनाकडे भारतात फुटबॉल क्रांतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. सर्व स्टेडियम आणि सराव स्थळे जागतिक दर्जाची असतील. सेप्पी म्हणाले, ‘फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषकास अद्याप सात महिने शिल्लक आहेत. पण, संपूर्ण तयारी वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहे. सर्वच स्टेडियमच्या डागडुजीचे काम एप्रिलपर्यंत संपणार आहे. भारतात पायाभूत सुविधांची सज्जता अखेरच्या क्षणापर्यंत पूर्ण होत नाही, हा समज आम्ही खोटा ठरविणार आहोत. स्टेडियममधील सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, मीडियाबॉक्स, ड्रेसिंग रूम ही सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहेत.’सेप्पी यांची नोव्हेंबर २०१४ मध्ये संचालकपदी नियुक्ती झाली. त्यावेळी काम कासवगतीने सुरू होते. त्यांच्या उपस्थितीत कामांनी वेग घेतला. डिसेंबर २०१४ मध्ये फिफाच्या चमूने पाहणी दौरा केला. यानंतर मागच्या फेब्रुवारी आणि आॅक्टोबरमध्ये पुन्हा दोन पाहणी दौरे झाले. (वृत्तसंस्था)ही प्रक्रिया दीर्घ होती. भारतात कामाची सुरुवात व्हायला वेळ लागतो. भारतातील आयोजन अन्य राष्ट्रांच्या तुलनेत वेगळे आहे. येथे लालफितशाहीचा मोठा अडसर आहे. वेगवेगळ्या राज्य शासनांकडे मागण्या करण्यात आल्या. यातील चांगली बाब ही की सर्वच शासनांकडून जबाबदारीने सहकार्य लाभले. - झेव्हियर सेप्पी, संचालक स्थानिक आयोजन समिती दृष्टिक्षेपात आयोजनच्स्पर्धेचा कालावधी : ६ ते २८ आॅक्टोबर २०१७च्आयोजन स्थळे : दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, मडगाव, कोच्ची आणि नवी मुंबई.च्संघ : २४, सामने: ५२, प्रेक्षक : २०० देशांतील जवळपास२० कोटी.