शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 20:07 IST

कर्णधार अलेक्झांडर कोलोरोवचा फ्री कीकवर अप्रितम गोल

समारा: फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी सर्बियाच्या संघाने कोस्टा रिकाचा 1-0 अशा गोल फरकाने पराभव केला. विश्वचषकाच्या ग्रुप ई मधली ही पहिलीच लढत होती. सर्बियाचा कर्णधार अलेक्झांडर कोलोरोव याने दुसऱ्या सत्रात मिळालेल्या फ्री कीकवर अप्रतिम गोल केला. याच गोलच्या जोरावर सर्बियाने आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले. ग्रुप ई मध्ये सर्बिया, कोस्टा रिकासह ब्राझील आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. त्यामुळं सर्बियासाठी हा विजय फारच महत्त्वाचा आहे.तत्पूर्वी पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, तुलनेत सर्बियाच्या संघाचे चेंडूवर जास्त वेळ नियंत्रण राहिले. कोस्टा रिकाच्या तुलनेत त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र, त्यांना या संधीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. तर दुसरीकडे कोस्टा रिकाच्या खेळाडूंमध्ये सुसूत्रता नसल्यामुळे त्यांचा आक्रमणात तितकीशी धार दिसून आली नाही. दुसऱ्या सत्रातील शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोस्टा रिकाच्या खेळाडुंनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नात काही खेळाडुंकडून धसमुसळा खेळही झाला. त्यामुळे कोस्टा रिकाच्या दोन खेळाडुंना पंचांनी पिवळे कार्ड दाखवले.

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Sportsक्रीडा