शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

सामन्यापूर्वी निराश वाटत होते

By admin | Updated: May 28, 2016 03:54 IST

आयपीएल २०१६ ची पहिली क्वालिफायर लढत माझ्यासाठी भीतीदायक स्वप्न आणि सुखद शेवट अशी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही मोठी संधी होती. दुपारी स्टेडियमकडे

एबी डिव्हिलियर्स लिहितो़...आयपीएल २०१६ ची पहिली क्वालिफायर लढत माझ्यासाठी भीतीदायक स्वप्न आणि सुखद शेवट अशी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही मोठी संधी होती. दुपारी स्टेडियमकडे रवाना झालो त्यावेळी मी माझ्या पत्नीला सांगितले की निराश वाटत आहे. मला चांगले वाटत नव्हते.त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत २० षटकांत गुजरात संघाला १५८ धावांत रोखले; पण त्यानंतर धवल कुलकर्णीने संस्मरणीय स्पेलमध्ये माझ्या संघातील अनेक सहकाऱ्यांना तंबूचा मार्ग दाखवला. दुसऱ्या टोकाला उभा राहून हे बघताना माझ्यावरील दडपण वाढत होते. आम्ही केवळ २९ धावांत पाच फलंदाज गमावले होते. भागीदारी होणे आवश्यक आहे, याचाच विचार करीत होतो. फार पुढचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर धावा कशा वसूल करता येईल, याचा विचार करीत होता. स्टुअर्ट बिन्नीसोबत अशी एक भागीदारी साकार होताना दिसली; पण त्यानंतर तो बाद झाला आणि स्कोअर झाला ६ बाद ६८. त्यानंतर इक्बाल अब्दुल्लाच्या रूपाने चांगला जोडीदार लाभला. तो खेळपट्टीवर आला त्यावेळी शांत होता. त्याने मला स्ट्राईक देण्यावर भर दिला आणि संधी मिळाल्यावर चेंडूला सीमारेषा दाखविताना केवळ माझ्यावरील दडपणच कमी केले नाही तर मला विश्वासही प्रदान केला. आघाडीची फळी कोसळल्यानंतरही सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असल्याचा मला विश्वास होता. टी-२० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. त्यानंतर आम्ही एकेरी-दुहेरी धावा घेत लक्ष्याचा समीप जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरम्यान, खराब चेंडूला सीमारेषा दाखविण्यास प्राधान्य दिले. एकवेळ आम्हाला जोखीम पत्करणे गरजेचे झाले होते. त्यावेळी पावसाचे सावट निर्माण झाले होते. कर्णधार कोहलीने मैदानावर संदेश पाठविला की १५ व्या षटकानंतर आक्रमक खेळ करणे आवश्यक आहे. हा निर्णय योग्य ठरला. आम्ही त्या षटकात १४ धावा वसूल केल्या.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा जल्लोष मंगळवारी अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक होता. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत स्टेडियममध्ये एवढा आवाज ऐकलेला नाही. इक्बालने सलग तीन चौकार ठोकल्यानंतर स्टेडियम या जल्लोषाचा एक भाग झाले. हा एक चांगला सांघिक प्रयत्न होता. आरसीबी व्यवस्थापनाचे अधिकारी, प्रशिक्षक आणि संघातील सर्वंच खेळाडू अंतिम फेरी गाठण्यामुळे खूश होते. आता आम्हाला जेतेपद पटकावण्याची गरज आहे. (टीसीएम)