शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फेडररची विजयी सलामी

By admin | Updated: March 27, 2017 01:01 IST

दुखापतींतून सावरून जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन टेनिस

मियामी : दुखापतींतून सावरून जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना त्याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोला नमवले. त्याच वेळी अन्य सामन्यात फेडररचाच देशबांधव स्टॅन वावरिंका यानेही विजयी आगेकूच केली.जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या टियाफोला फेडररच्या दमदार खेळापुढे चांगलेच झुंजावे लागले. फेडररने जबरदस्त सर्विस करताना टियाफोला बेजार केले. पहिल्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागल्यानंतर फेडररने आपला हिसका दाखवताना टियाफोचे आव्हान ७-६, ६-३ असे संपुष्टात आणले. पहिला सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर तुफानी सर्व्हिस करताना फेडररने ७-२ अशी बाजी मारली. दुसरीकडे यूएस ओपन विजेत्या वावरिंकाने विजयी आगेकूच करताना अर्जेंटिनाच्या होरासियो जेबालोसला सहज लोळवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात होरासियोला पुनरागमनाची एकही संधी न देताना वावरिंकाने ६-३, ६-४ अशी बाजी मारली. वावरिंकापुढे पुढच्या फेरीत ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीचे आव्हान असेल. जाजिरीने पहिल्या फेरीत स्पेनच्या फेलिसियानो लोपेझला ६-३, ४-६, ६-३ असे नमवले. महिलांमध्ये पहिल्याच फेरीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. पाचव्या मानांकित एग्निस्का रादवांस्काला क्रोएशियाच्या मिरजाना लुसिच बारोनीविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेत खळबळ माजली. मिरजानाने कसलेल्या रादवांस्काला ६-०, ६-३ अशी सहजपणे धूळ चारत सर्वांचे लक्ष वेधले. अन्य लढतीत द्वितीय मानांकित कॅरोलिना पिलिस्कोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना यूलिया पुतिनसेवाला ७-५, ६-३ असे नमवले. (वृत्तसंस्था)