शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

फेडररची आगेकूच, बुचार्ड दुखापतग्रस्त

By admin | Updated: September 7, 2015 00:16 IST

रॉजर फेडररने फिलीप कोलश्रायबरचा दहाव्यांदा पराभव करताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर कॅनडाची ‘गोल्डन गर्ल’ इयुगेनी बुचार्डला डोक्याला

न्यूयॉर्क : रॉजर फेडररने फिलीप कोलश्रायबरचा दहाव्यांदा पराभव करताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर कॅनडाची ‘गोल्डन गर्ल’ इयुगेनी बुचार्डला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. पाच वेळा जेतेपदाचा मान मिळविणारा व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररने २९ वे मानांकन असलेल्या जर्मनीचा खेळाडू फिलीप कोलश्रायबरचा ६-३, ६-४, ६-४ ने पराभव केला. केन रोसवेल (१९७०) याच्यानंतर यूएस ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा सर्वात प्रौढ खेळाडू ठरण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ३४ वर्षीय फेडररला यानंतर १३ वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या जॉन इस्नेरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. इस्नेरने चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लेने मानेच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. वेस्लेने माघार घेतली, त्या वेळी इस्नेर दोन सेट जिंंकत आघाडीवर होता. बुचार्ड महिलांसाठी असलेल्या लॉकर रूममध्ये पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला सल्ला मानताना २१ वर्षीय बुचार्डने महिला व मिश्र दुहेरीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिला अंतिम १६ खेळाडूंमध्ये रॉबर्टो विन्सीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धा संचालक डेव्हिड ब्रेवर म्हणाले, ‘‘दुखापत गंभीर असून यूएस ओपनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तिच्या दुखापतीवर लक्ष आहे. बुचार्ड एकेरीमध्ये खेळेल किंवा नाही, हे आताच सांगणे अवघड आहे.’’ तिसरे मानांकनप्राप्त ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने ३० वे मानांकन प्राप्त ब्राझीलच्या थॉमस बेलुचीचा ६-३, ६-२, ७-५ ने सहज पराभव केला. मरेला पुढच्या फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अ‍ॅण्डरसनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अ‍ॅण्डरसनने २० वे मानांकन प्राप्त आॅस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा ६-३, ७-६, ७-६ ने पराभव केला. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्टेनिस्लास वावरिंकाने अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. वावरिंकाने बेल्जियमच्या रुबेन बेमेलमेन्सचा ६-३, ७-६, ६-४ ने पराभव केला. सहावे मानांकन प्राप्त चेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचने ३१ वे मानांकन प्राप्त स्पेनच्या गुलेर्मो गर्सिया लोपेझची झुंज ६-७, ७-६, ६-३, ६-३ ने मोडून काढली. अमेरिकेच्या डोनाल्ड यंगने २२ वे मानांकन प्राप्त सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोइस्कीविरुद्ध ४-६, ०-६, ७-६, ६-२, ६-४ ने संघर्षपूर्ण विजय मिळवीत धक्कादायक निकाल नोंदवला. १२ वे मानांकन प्राप्त फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने २४ वे मानांकन प्राप्त आॅस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमीचविरुद्ध ६-४, ६-३, ६-१ ने विजय मिळवला. बर्डीच व गास्केट यांच्यादरम्यान पुढच्या फेरीत लढत होणार आहे. महिला विभागात दोनदा उपविजेती ठरलेली आणि २० वे मानांकन प्राप्त व्हिक्टोरिया अझारेंकाने आर्थर एस स्टेडियममध्ये जवळजवळ तीन तास रंगलेल्या लढतीत ११ वे मानांकन प्राप्त जर्मनीच्या एंजेलिक केरबरचा ७-५, २-६, ६-४ ने पराभव केला. उभय खेळाडूंनी या लढतीत एकूण २६ ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला. अझारेंकाला उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या वार्वरा लेपचेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.दुसरे मानांकन प्राप्त रोमानियाच्या सबाईन लिस्कीने अमेरिकेच्या शेल्बी रोजर्सवर ६-२, ६-३ ने सहज मात केली; तर विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवाने स्लोव्हाकियाच्या अ‍ॅना करोलिना शिदलोव्हावर ६-२, ६-१ ने मात केली. क्विटोवाला पुढच्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आगेकूच करणाऱ्या ब्रिटनच्या जोहान कोंटाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कोंटाने १८ वे मानांकन प्राप्त जर्मनीच्या आंद्रिया पेतकोविचचा ७-६, ६-३ ने पराभव केला. कोंटा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत प्रथमच चौथी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. या स्पर्धेत सेरेना विल्यम्सचा पराभव करणारी अखेरची महिला खेळाडू व २०११ ची चॅम्पियन आॅस्ट्रेलियाची समंथा स्टोसूरने इटलीच्या सारा इराणीचा ७-५, २-६, ६-१ ने पराभव केला.