शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फेडररने जिंकले सातवे सिनसिनाटी विजेतेपद

By admin | Updated: August 25, 2015 04:18 IST

स्वीसचा दिग्गज रॉजर फेडरर याने जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचा ७-६, ६-३ असा पराभव करून सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे

सिनसिनाटी : स्वीसचा दिग्गज रॉजर फेडरर याने जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचा ७-६, ६-३ असा पराभव करून सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.फेडररने उपांत्य फेरीत अँडी मरेला पराभूत केल्यानंतर जोकोविचला विजेतेपदाच्या लढतीत धूळ चारली. विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचकडून पराभूत झाल्यानंतर रॉजर फेडरर पहिलीच स्पर्धा खेळत होता. विजयानंतर फेडरर म्हणाला, ‘‘हा सुरेख विजय आहे. मी बऱ्याच कालावधीपासून खेळलो नव्हतो. त्यामुळे मला विजयाची आशा नव्हती.’’ या विजयामुळे मरेला पिछाडीवर टाकून फेडरर दुसऱ्या स्थानावर कब्जा करणार आहे. तसेच, ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन ओपनमध्ये त्याला द्वितीय मानांकन मिळेल. फेडररचे हे ८७वे एटीपी विजेतेपद आणि २४वे मास्टर्स ट्रॉफीचे अजिंक्यपद आहे.(वृत्तसंस्था)सेरेना अजिंक्यगत चॅम्पियन अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनवरदेखील कब्जा करण्याचे संकेत देताना रुमानियाच्या सिमोना हालेप हिला पराभूत करून सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने तृतीय मानांकित हालेप हिचा ६-३, ७-६ असा पराभव करताना विजेतेपदाचा बचाव केला.