शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

वडील म्हणायचे, नापास झाला तर तुझी फी तूच भर; उसेन बोल्टने सांगितली घरची परिस्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:06 IST

भावडांसोबत दिवसभर गल्लीत क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात बालपण गेलं. तेव्हा वाटलं नव्हतं की मी कधी जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल.

मैका देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील अत्यंत लहान गाव शेरवुड कंटेंट. डोंगराळ भागातील या खेड्यात तेव्हा ना नीट रस्ते, ना वीज. ना प्रत्येक घरी पाण्याची सोय. अशा स्थितीत एका गरीब कुटुंबात जन्म झाला. आई-वडिल दोघे गावात एक किराणा दुकान चालवाचे. त्यातूनच त्यांनी घरखर्च भागवून आम्हाला शिकविले.

भावडांसोबत दिवसभर गल्लीत क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात बालपण गेलं. तेव्हा वाटलं नव्हतं की मी कधी जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल. गावातील सरकारी शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचो. वयाच्या १२ वर्षीच ठरवलं की, खेळात करियर करायचे पण फुटबॉल की क्रिकेट हा गोंधळ होताच. एकदा क्रिकेटच्या प्रशिक्षकाने पिचवर धावण्याची गती पाहिली आणि सल्ला दिला की मी धावण्याचा सराव करावा. यातून माझी भेट एका प्रशिक्षकाशी झाली. जे स्वतः ऑलिंपिक धावपटू होते. त्यांनी माझ्या वेगावर विश्वास ठेवला. सगळ्यांना माझ्यातली क्षमता दिसत होती, पण मीच कधी ती गंभीरपणे घेतली नव्हती. १५ वर्षाचा असताना विभागीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुढे वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण पदकासह तीन पदके मिळवली. नंतर थांबलोच नाही, अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत गेलो.

आई-वडिलांकडून शिकलोआई-वडील माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहेत. माझ्या बालपणी ते खूप मेहनत करत असत. ते गरीबीत खूप साधं जीवन जगले. त्यांच्याकडूनच मी शिकलो की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि सचोटीने जगावं.

...तर वेगवान गोलंदाज असतोमी स्वतःवर फारसा दबाव आणत नाही. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. माझे स्वप्न होते की मी एक वेगवान गोलंदाज बनेल. वडील क्रिकेटचे चाहते होते. त्यांच्याकडूनच मी प्रेरणा घेतली होती. आज धावपटू नसतो, तर कदाचित वेगवान गोलंदाज असतो.

स्वतःवर मर्यादा घालू नकामी दाखवून दिले की काहीही शक्य आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, स्वतःवर मर्यादा घालू नका. तुम्हाला काय चांगलं जमतं किंवा काय आवडतं हे शोधा आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. ते करताना मजा घ्या, त्यामुळे आयुष्य अजून सुंदर होतं. वडील कडक शिस्तीचे : आमचे वडील कडक शिस्तीचे. एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकासारखे ते घर चालवाचे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा स्पष्ट आणि ठाम दृष्टिकोन होता. ते म्हणायचे की, मी तुझ्या शाळेची फी फक्त एकदाच भरतो! पास झाला तर ठीक आहे, पण नापास झाला, तर पुढच्या वेळची फी तू स्वतः भर.     संकलन : महेश घोराळे