शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

पिता-पुत्राची धमाल!

By admin | Updated: March 14, 2017 00:50 IST

वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल अनेकांच्या स्मरणात असेलच. हा फलंदाज अजूनही क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय आहे.

जमैका : वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल अनेकांच्या स्मरणात असेलच. हा फलंदाज अजूनही क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या शिवनारायणने रविवारी (दि.१२) त्याच्या मुलासोबत धमाल कामगिरी केली. या दोघांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकाविले. या अर्धशतकीय धडाक्यामुळे चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेगनारायण चर्चेत आले आहेत. चारदिवसीय स्पर्धेत जमैकाविरुद्ध गयानाकडून खेळताना चंद्रपॉल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्या मुलाने संघाची सुरुवात केली होती. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १२.२ षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या योगदानामुळे गयानाने पहिल्या डावात २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जमैकाचा डाव २५५ धावांवर आटोपला. चंद्रपॉल सध्या ४२ वर्षांचा असून तो राष्ट्रीय संघाबाहेर आहे. त्याच्यात आणि मुलात २१ वर्षांचे अंतर आहे. चंद्रपॉलने १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. १९९६ मध्ये त्याचा मुलगा तेगनारायण याचा जन्म झाला होता. आता दोघेही सोबतच खेळतात. या सामन्यापूर्वी सुद्धा त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. २०१२ मध्ये गांधी युथ संस्थेकडून खेळताना पिता-पुत्रांनी २५६ धावांची भागीदारी केली होती. तेव्हाही या दोघांची चर्चा रंगली होती. पिता-पुत्रात बरेच साम्य आहे. चंद्रपॉलप्रमाणेच त्याचा मुलगाही डावखुरा फलंदाज आहे. पीचवर गार्ड घेण्यासाठी सुद्धा तो चंद्रपॉलप्रमाणेच बेलला जमिनीवर ठोकून निशाणी तयार करतो. (वृत्तसंस्था)