शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

वेगवान गोलंदाज विश्वास सार्थ ठरवित आहेत

By admin | Updated: May 1, 2017 01:38 IST

सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचे श्वास रोखून धरायला लावणारे षटक आयपीएल २०१७ च्या संस्मरणीय आठवणींमध्ये स्थान

-रवी शास्त्री -सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचे श्वास रोखून धरायला लावणारे षटक आयपीएल २०१७ च्या संस्मरणीय आठवणींमध्ये स्थान मिळवणारे ठरले. त्याने नो-बॉल व वाईड चेंडू टाकले तरी मॅक्युलम व फिंचच्या बॅटला मात्र फटकेबाजी करता आली नाही. त्याचे जास्तीत जास्त चेंडू यॉर्क र होेते. चेंडू किती वेगाने त्यांच्याकडे येत आहे, याचा अंदाज फलंदाजांना घेता येत नव्हता. दोन अवांतर चेंडू आणि एक फ्री हिट महागडे ठरले नाही. गुजरातचे दोन विशेष फलंदाज केवळ चेंडूचा अंदाज घेत असल्याचे दिसून आले. यंदाच्या आयपीएलमध्ये राशिद, बद्री व ताहिर यांनी चमकदार कामगिरी करीत छाप सोडल्यानंतर आता वेगवान गोलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. सुनील नरेन व कुलदीप यादव यांची उपस्थिती संघासाठी लाभदायक ठरत असली तरी प्रत्येक संघातील वेगवान गोलंदाजच प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीवर वर्चस्व गाजवित आहेत. दिल्लीविरुद्ध मुंबईची आणि बंगळुरुविरुद्ध कोलकाता संघाची कामगिरी बघितल्यानंतर याची प्रचिती येते. फिरकी गोलंदाजी महत्त्वाची आहे, पण प्रतिस्पर्धी संघावर दहशत निर्माण करण्यासाठी वेगवान गोलंदाजी महत्त्वाची ठरते. नॅथन कुल्टर नाईलने कोलकाता संघाला आणखी एक लढत जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिस मॉरिस फलंदाजांना जास्तीत जास्त पायचित बाद करतो. उमेश यादव त्यांच्या यष्टीला लक्ष्य करतो. मिशेल जॉन्सन व कॅगिसो रबाडा यांना लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे. टायने येताच मात्र आपली छाप सोडली. पॅट कमिन्स प्रसिद्धीच्या झोतात न येता आपली भूमिका चोख बजावत आहे. बासिल थंपी व सिद्धार्थ कौल यांचे नाव यापूर्वी विशेष ऐकलेले नव्हते आणि भुवनेश्वरकडे कुणीच डोळेझाक करणार नाही. कुठल्याही फलंदाजासाठी त्याच्या चेंडूचा अंदाज घेणे अडचणीचे ठरत आहे. यातील जास्तीत जास्त गोलंदाजांचे मुख्य अस्त्र यॉर्कर आहे. हे सर्व चेंडूच्या वेगामध्ये बदल करण्यास माहिर आहेत. क्षेत्ररक्षण कसे सजवायचे, याची त्यांना चांगली माहिती आहे. जवळजवळ सर्वच कर्णधार त्यांच्यासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण लावतात. कर्णधारांचा त्यांच्यावर विश्वास असून ते हा विश्वास सार्थ ठरवित आहेत. (टीसीएम)