ऑनलाइन लोकतमनवी दिल्ली, दि. २ - थाळीफेकपटू इंद्रजीत सिंग याच्या ब नमुण्यातही प्रतिबंधित औषध सापडल्याने रिओ आॅलिम्पिकमधील त्याच्या सहभागाची शक्यता संपुष्टात आली आहे.२८ वर्षांच्या इंद्रजीतचा अ नमुना २५ जून रोजी पॉझिटिव्ह आढळला. स्टेरॉईड एंड्रोस्टेरोन आणि इटियोकोलेनोलोन हे प्रतिबंधित औषध शरीरात आढळले होते.‘ब’ नमुन्यातही आज हेच द्रव्य आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) त्याला नोटीस बजावली असून सुनावणीसाठी शिस्तपालन पॅनलपुढे हजर होण्यास सांगितले. इंद्रजीत पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडणार आहे. इंद्रजीतची स्पर्धेबाहेरची चाचणी २२ जून रोजी झाली होती.२०१४ च्या आशियाडमध्ये कांस्य विजेता असलेल्या इंद्रजीतचा अ नमुना पॉझिटिव्ह आढळताच पंजाबमध्ये जन्मलेल्या या खेळाडूला नाडाने ब नमुन्याची चाचणी करायची झाल्यास सात दिवसांच्या आत सॅम्पल देऊ शकतो, असे कळविलेहोते. इंद्रजीतने गत गुरुवारी ब नमुन्याच्या चाचणीसाठी अर्ज केला होता. आज त्याचा निकाल आला. त्याला वाडाच्या नव्या आचारसंहितेनुसार चार वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागेल. माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला आहे, असा दावा इंद्रजीतने केला होता. चाचणी नमुन्यासोबतही अफरातफर झाली असावी, अशी शंका व्यक्त करीत शरीरास हानीकारक वस्तू मी कशी खाणार, असा उलट सवाल त्याने केला. इंद्रजीत हा राष्ट्रीय शिबिराऐवजी खासगी कोचच्यामार्गदर्शनात सराव करतो.
थाळीफेकपटू इंद्रजीत ‘ब’ नमुण्यातही ‘फेल’
By admin | Updated: August 2, 2016 23:09 IST