शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

प्रगतीतून अधोगतीकडे

By admin | Updated: December 29, 2014 04:28 IST

विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक शतके झळकावीत मेलबोर्न क्रि केट मैदानावर चौथ्या विकेटसाठी नोंदविलेल्या २६२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर

मेलबोर्न : विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक शतके झळकावीत मेलबोर्न क्रिकेट मैदानावर चौथ्या विकेटसाठी नोंदविलेल्या २६२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर अखेरच्या सत्रात ३ बाद ४0९ वरुन ८ बाद ४६२ अशी घसरगुंडी उडाली. यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रगतीतून अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या सत्रात लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि अश्विन यांनी हाराकिरी केली. भारताला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या (५३०) गाठण्यासाठी अद्याप ६८ धावांची गरज आहे.काल, शनिवारच्या १ बाद १०८ धावसंख्येवरून पुढे खेळताना मुरली विजय (६८) व चेतेश्वर पुजारा (२५) झटपट बाद झाले. त्यानंतर कोहली (१६९) व रहाणे (१४७) यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करीत भारताचा डाव सावरला. भारताने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ४६२ धावांची मजल मारली. कोहली व रहाणे यांनी एमसीजीवर पाहुण्या संघातर्फे चौथ्या विकेटसाठी सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम नोंदविला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. भारताने ११२ चेंडूंमध्ये ५३ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट गमाविल्या. कोहली दिवसाच्या अखेरच्या षटकात मिशेल जॉन्सनच्या (१-१३३) गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान कोहलीचा जॉन्सनसोबत वाद झाला होता. कोहलीने कारकिर्दीतील नववे, तर मालिकेतील तिसरे शतक झळकाविले. कोहलीने २७२ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकारांच्या साह्याने १६९ धावांची खेळी केली. रहाणेला नॅथन लियोनने (२-१०८) तंबूचा मार्ग दाखविल्यानंतर भारताच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. रहाणेने १७१ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकारांच्या साह्याने १४७ धावा फटकाविल्या. रहाणेने आज, रविवारी ८५.९६ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकाविल्या. रहाणेचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या लोकेश राहुलला (३) मोठी खेळी करता आली नाही. लियोनच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरलेल्या राहुल लोकेशने पुढच्याच चेंडूवर फाईन लेगला तैनात जोश हेजलवूडला झेल दिला. त्यानतंर आॅस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी गोलंदाज रॅन हॅरिसने (४-६९) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (११) व रवीचंद्रन अश्विन (०) यांना झटपट माघारी परतविले. (वृत्तसंस्था)दरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर असताना कोहलीचा जॉन्सनसोबत वाद झाला होता. त्यानंतर लगेच जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराटचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात वॉटसनला टिपण्यात अपयश आले. त्यावेळी विराट ८८ धावांवर होता. (वृत्तसंस्था)