शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

फखर जमानला नशिबाची साथ, झळकावलं खणखणीत शतक

By admin | Updated: June 18, 2017 18:58 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं. अवघ्या 106 चेंडूंमध्ये 114 धावा करत त्याने भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तान सुस्थितीत पोहोचला असून शेवटचं वृत्त येईपर्यंत पाकिस्तानच्या 37 षटकात 2 गडी बाद 227 धावा झाल्या आहेत.
 
114 धावांच्या या शानदार खेळीदरम्यान फखर जमानला नशिबाचीही जोरदार साथ मिळाली. भारताकडून जसप्रित बुमराहने टाकलेल्या  चौथ्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये फखर जमान हा धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता. त्यावेळी तो केवळ 3 धावांवर खेळत होता. पण त्याला नशिबाची साथ मिळाली कारण बुमराहचा हा बॉल रिप्ले बघितल्यानंतर नो-बॉल देण्यात आला. त्यानंतरही फखर जमानला धावचीत करण्याची संधी भारतीय क्षेत्ररक्षकांना होती पण त्यांंचं क्षेत्ररक्षण लौकिकास साजेसं झालं नाही.
 
फखार झमान याने दुसरा सलामीवीर अझहर अली याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी तब्बल 128 धावांची भागीदारी करत भारतीय आक्रमणामधली हवाच काढून टाकली. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तानकडे भारतासमोर मोठं आव्हान देण्याची संधी आहे.