शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोगट भगिनींची हकालपट्टी, परवानगी न घेता रितू, संगीताने सोडले होते शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:21 IST

गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले. आशियाडसाठी सुरू असलेल्या तयारी शिबिरातून अचानक बेपत्ता झालेल्या या भगिनींपैकी बबिताने जखमी असल्याचा दावा केला.‘दंगल’ या हिंदी चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय ठरलेल्या गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनी सुरू असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली.याआधी बेशिस्तीच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींना शिबिरातून हाकलून दिले. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. शिबिरातील खेळाडूंना एशियाडमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र फोगट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबिताने सांगितले आहे. मात्र गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले. मी आतापर्यंत शिबिरात गेले नाही. माझ्या दोन्ही गुडघ्यांना जखम आहे. मी महासंघाला हे कळविले नव्हते पण आजच माहिती देणार आहे. कुठलीही नोटीस मिळालेली नाही, असे ती म्हणाली. गीता बेंगळुरू येथे असून मी जेएसडब्ल्यू सेंटरमध्ये उपचारासाठी जात असल्याचे बबिताने सांगितले.पुरुष व महिलांचे राष्टÑीय शिबिर १० ते २५ मे या कालावधीत अनुक्रमे सोनीपत व लखनौ येथे होईल. मल्ल साक्षी मलिकव व तिचा पती सत्यव्रत कदियान हे दोघेही शिबिराबाहेर आहेत. (वृत्तसंस्था)