शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथनचा धमाका

By admin | Updated: June 28, 2017 00:48 IST

भारताच्या रामकुमार रामनाथनने अंताल्या ओपन टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत खळबळजनक निकालाची नोंद करताना

अंताल्या (तुर्कस्थान) : भारताच्या रामकुमार रामनाथनने अंताल्या ओपन टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थिएमचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रामनाथनच्या कारकिर्दीमधील हा सर्वात मोठा विजय आहे.जागतिक क्रमवारीत २२२व्या स्थानावर असलेल्या रामनाथनने सर्वांना आश्चर्याचा धक्का देताना डॉमनिकला ६-३, ६-२ असा धक्का देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. त्याने आक्रमक खेळाच्या जोरावर आॅस्टे्रलियाई खेळाडूचे तगडे आव्हान केवळ ५९ मिनिटांमध्ये परतावून लावले. यासह रामनाथनने अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना इतर खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला. एटीपी क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या खेळाडूविरुध्द मिळवलेला रामनाथचा हा पहिला विजय आहे. हा धमाकेदार विजय मिळवल्यानंतर रामनाथनने, ‘या विजयासाठी मी खरंच खूप मेहनत घेतली आहे,’ अशी प्रतिक्रीया दिली. तसेच, यानंतर भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीनेही ट्वीट केले की, ‘रामकुमारसाठी हा एक रोमांचक विजय ठरला. अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूला नमवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास खूप वाढेल. तो काय करु शकतो याची प्रचिती येईल.’ रामनाथनने पहिल्या फेरीतही दमदार बाजी मारत ब्राझीलच्या रोजेरियो दुत्रा सिल्वाला ६-३, ६-४ असे नमवून विजयी सलामी दिली होती. (वृत्तसंस्था)