शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंजाब-कोलकाता रंगतदार लढत होण्याची अपेक्षा

By admin | Updated: May 4, 2016 04:03 IST

कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे. नेतृत्वामध्ये बदल झाल्यामुळे कामगिरी सुधारली असल्याचे संकेत प्रतिस्पर्धी किंग्ज इलेव्हन संघाने दिले आहेत. त्यामुळे उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. जवळजवळ तीन आठवडे गृहमैदानापासून दूर असलेल्या, दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर आपल्या सातपैकी जवळजवळ सहा सामने खेळले असून, त्यांपैकी चार जिंकले आहेत. सोमवारी युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर केकेआर संघ ईडन गार्डन्सवर परतत आहे.उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.