कोलकता : वनडेत दोन द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनल्यानंतरही रोहित शर्माने अजूनही खूप काही प्राप्त करण्याचे बाकी असून,, आता अपेक्षा आणि जबाबदारी वाढेल, असे मत व्यक्त केले आहे.
श्रीलंकेवर चौथ्या वनडेत 153 धावांनी मिळवलेल्या विजयात रोहितने विक्रमी 264 धावांची खेळी केली. ही वनडेतील फक्त मोठीच खेळी नाही, तर 50 षटकांत 2 द्विशतके झळकावणारा तो पहिला फलंदाजही बनला. त्याने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले.
रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, मला अजून खूप काही करायचे आहे. जेव्हा मी युवा होतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू इच्छित होतो, तेव्हा असे होईल, याचा मी विचारही केला नव्हता. रेकॉर्ड होत राहतात. अपेक्षा वाढत जातील. त्यामुळे मला आणखी मेहनत करावी लागणार आहे. माङया खांद्यावर अधिक जबाबदारी असेल.
दुखापतीनंतर पुनरागमनानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणा:या रोहितने याआधीचे अपयश त्याची प्रगती रोखू शकत नसल्याचेही म्हटले. तो म्हणाला, तुम्हाला यश आणि अपयश हे स्वीकारून पुढे जावे लागते आणि मी असेच केले आहे. परदेशातील काही अपयशामुळे माङो क्रिकेट थांबलेले नाही. माङो क्रिकेट आणि मेहनत पुढेही सुरूअसेल आणि मी मेहनत पुढेही करीतच राहणार.रोहितने आपल्या विक्रमी खेळीची सुरुवात संथ केली होती आणि अॅन्जोलो मॅथ्यूजने त्याला पहिले षटक निर्धाव टाकले होते. (वृत्तसंस्था)
रोहित म्हणाला, दुखापतीमुळे दोन महिन्यांनंतर पुनरागमन केल्यामुळे सुरुवातीला मला संघर्ष करावा लागला आणि मोकळेपणाने फटके मारूशकलो नव्हतो. सुरुवातीची 10 ते 15 षटके सोपी नव्हती. टिकून खेळण्याचे मी स्वत:ला बजावत होतो. रहाणोच्या आक्रमक खेळीने मला मदत झाली. मी हा सामना संघासाठी विशेष बनवू इच्छित होतो.
रोहितने बीसीसीआयचे फिजिओ वैभव डागा यांचे आभार मानले. तो म्हणाला, ते खूप खूश असतील, याचा विश्वास आहे. गत दोन महिने माङयासाठी खूप कठीण होते. मी बीसीसीआयचे फिजिओ वैभव डागा यांचे आभार मानू इच्छितो. दोघांसाठी हे मोठे आव्हान होते. त्यांनी माङयाबरोबर खूप मेहनत घेतली.