शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

बॅकवॉटरमध्ये कौशल्य, समन्वय, सांघिक भावनेचा जल्लोष; ट्रॉपिकल टायटन्सने जिंकली हजारो प्रेक्षकांची मने

By विशाल सोनटक्के | Updated: November 26, 2022 21:51 IST

चॅम्पियन बोट लीग : सामन्यासाठी बॅकवॉटर परिसरात सकाळपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि आवेश दिसून येत होता.

- विशाल सोनटक्के

कोल्लम (केरळ) : भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा असलेल्या चॅम्पियन बोट लीग स्पर्धेवर अखेर शनिवारी ट्रॉपिकल टायटन्सच्या संघाने कब्जा मिळवला. रोईंगमधील कौशल्य, संघातील शंभरावर खेळाडूंमध्ये असलेला अचूक समन्वय आणि सांघिक भावनेच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी नऊ संघांना धोबीपछाड दिली. कोल्लम येथील प्रेसिडेंट ट्रॉफी बोट रेसवर अंतिम सामन्याचा हा थरार पाहण्यासाठी केरळसह देश-विदेशातील हजारो बोटिंग रसिकांनी उपस्थिती लावली होती.

शनिवारी दुपारी २ च्या सुमारास पारंपरिक वांद्यांच्या गजरात आणि लोकनृत्याच्या साथीने या राष्ट्रपती करंडक बोट शर्यत आणि चॅम्पियन लीग बोटच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यासाठी बॅकवॉटर परिसरात सकाळपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि आवेश दिसून येत होता. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच ट्रॉपिकल टायटन्सने आघाडी घेतली. अखेर सायंकाळच्या सुमारास अंतिम फेरीमध्ये ११६ गुणांची कमाई करत ट्रॉपिकलने मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बोट लीग चषकावर विजयाची मोहर उमटविली. १०७ गुणांसह मायटी ओर्स द्वितीय स्थानावर तर ९२ गुण मिळवत रॅगिंग रॉवर्स संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

शेती संस्कृतीच्या उत्सवाने पर्यटनाला चालनाकेरळमधील बोटिंग स्पर्धा या केरळच्या शेती संस्कृतीचा अविभाज्य घटक मानला जातात. त्यामुळे पावसाळ्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केरळच्या शांत बॅकवॉटरमध्ये उत्कंठा आणि आवेश निर्माण करणारी ही स्पर्धा भरते. या स्पर्धेमुळे केरळबरोबरच देश-विदेशातील पर्यटक खास चॅम्पियन बोट लीग पाहण्यासाठी केरळमध्ये दाखल झालेले असतात. शनिवारीही याचा प्रत्यय आला. प्रेसिडेंट बोट रेस क्लबसह परिसरातील बॅकवॉटरमध्ये रेसिंगच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

राज्यात १२ ठिकाणी झाल्या स्पर्धा

मागील ६८ वर्षांपासून केरळमध्ये ही बोट रेस स्पर्धा घेतली जाते. मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र, यावर्षी प्रादुर्भाव कमी होताच ४ सप्टेंबर रोजी अल्लापुझ्झा येथून या बोट रेसला प्रारंभ झाला. राज्यातील वेगवेगळ्या १२ बॅकवॉटरमध्ये विविध फेऱ्या पार पडल्यानंतर शनिवारी कोल्लम येथे ही अंतिम स्पर्धा पार पडली. एकूण सात कोटींच्या बक्षिसांची रक्कम असलेल्या या स्पर्धेतील चॅम्पियन लीग विजेत्याला २५ लाख रुपये, उपविजेत्याला १५ लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला १० लाखांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विविध फेरीतील विजेत्या संघांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Keralaकेरळ