शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोप

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोपरियो डि जनेरियो : दरोडे, प्रेक्षकांतील हिंसा आणि दहशतवादी हल्ले अशा सर्व काही संभाव्य शक्यता आहेत. त्यामुळे २0१६ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या एक वर्षाआधीच ऑलिम्पिक सुरक्षाप्रमुखांची झोप उडाली आहे.रिओ ऑलिम्पिकमध्ये १0 हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय लाखो प्रेक्षकांनाही सुरक्षा पुरवायची आहे. कोणताही धोका न पत्करता ८५ ...


ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोप
रियो डि जनेरियो : दरोडे, प्रेक्षकांतील हिंसा आणि दहशतवादी हल्ले अशा सर्व काही संभाव्य शक्यता आहेत. त्यामुळे २0१६ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या एक वर्षाआधीच ऑलिम्पिक सुरक्षाप्रमुखांची झोप उडाली आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये १0 हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय लाखो प्रेक्षकांनाही सुरक्षा पुरवायची आहे. कोणताही धोका न पत्करता ८५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, जे की २0१२ लंडन ऑलिम्पिकच्या २0 हजार सुरक्षा कर्मचार्‍यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक असल्याचे रियोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
ब्राझील हे हिंसेसाठी बदनाम आहे आणि येथे प्रत्येक वर्षी जवळपास ५२ हजार जणांची हत्या होत असते. त्यातच रियो येथेच प्रत्येक दिवसाची सरासरी तीनपेक्षा अधिक हत्येची असते.
तथापि, ब्राझीलने गेल्या काही वर्षांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यात २0१२मध्ये यूएन रियो पर्यावरण संमेलनाचा समावेश आहे. त्यात १९१ देशांनी सहभाग घेतला होता.
रियोचे सुरक्षाप्रमुख आंद्रेई पासोस रॉड्रिगेज म्हणाले, 'कोणत्याही अन्य देशांनी इतक्या कमी वेळेत इतक्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले नाही आणि त्याचा आम्हाला मोठा अनुभव मिळाला आहे, त्याचा उपयोग आम्ही ऑलिम्पिकदरम्यान करू शकतो.'
सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकारी अनेक बाबींवर लक्ष देत आहेत. रियोत गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे; परंतु त्यानंतरही अजूनही काही गुन्हे होत आहेत. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांतच दररोज सरासरीने ३ ते ४ हत्या होत आहेत. रियोतील स्थानिक स्तरावर होणारी हिंसा प्रकाशझोतात येते आणि त्यामुळे तेथे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक केंद्राच्या पूर्ण परिसरात रात्री बाहेर निघणे हे धोकादायक मानले जाते. अधिकांश निवासी हे सध्याच्या वातावरणात ऑलिम्पिकच्या सेलिंग स्पर्धेसाठी टॅक्सीशिवाय मरिना येथे जाण्यास नकार देतील. कारण त्याजवळील पार्क हे लुटमारीसाठी बदनाम आहे. याशिवाय ऑलिम्पिककडे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता म्हणूनही पाहिले जात आहे.
ऑलिम्पिक इतिहासात अजूनही १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये दहशतवाद्यांद्वारे इस्रायली खेळाडूच्या हत्येची छाया आहे; परंतु आजचे संभाव्य धोके वाढले आहेत, त्यात ड्रोनच्या धोक्याचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)
=================================