शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

युरो चषक - पोर्तुगाल अंतिम फेरीत

By admin | Updated: July 7, 2016 04:49 IST

पोर्तुगाल आणि वेल्स यांच्यातील युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोर्तुगालने विजय मिळविला. या सामन्यात पोर्तुगालने वेल्सवर २-० अशी मात केली.

लेयॉन (फ्रान्स) : बलाढ्य पोर्तुगालने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत नवख्या वेल्सला २-० असे पराभूत करत युरो चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला. पोर्तुगालकडून रोनाल्डो व नानीने प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहचलेल्या वेल्सने पोर्तुगालला कडवी टक्कर दिली मात्र स्टार खेळाडू रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालला पराभूत करण्यात ते अपयशी ठरले. अंतिम सामन्यात पोर्तुगालची लढत आज होणाऱ्या जर्मनी विरुद्ध फ्रान्स सामन्यातील विजेत्याशी होईल.वेल्सने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती.त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोर्तुगालने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्यावर पकड ठेवली. वेल्सचा स्टार खेळाडू गेरार्थ बेल व अ‍ॅशले विल्यम्स यांनी सातत्याने पोर्तुगालवर वर्चस्व मिळवण्यासाठी गोलपोस्टवर धडका मारल्या. मात्र पोर्तुगालच्या संरक्षक फळीने त्यांचे प्रयत्न उधळून लावले. पोर्तुगालच्या बाजूने नवख्या रॅनेटो सँचेस व अनुभवी रोनाल्डो यांनीही आक्रमण केले. मात्र पोर्तुगालने गोल करण्याच्या तिनही संधी दवडल्या.त्यामुळे पुर्वार्ध गोलशून्य बरोबरीतच राहिला. उत्तरार्धात मात्र पोर्तुगालने आक्रमक पावित्रा घेतला. सामन्याच्या ५० व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर रोनाल्डोने अप्रतिम हेडरद्वारे गोल करत संघाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पोर्तुगालच्या समर्थकांनी एकच जल्लाष केला. पाठोपाठ ५३ व्या मिनिटाला रोनाल्डोने दिलेल्या पासचे सोने करत नानीने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला.या गोलनंतर २-० अशी पिछाडी झाल्याने वेल्सचा संघ हडबडून गेला. त्यांनी गोल फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र पोर्तुगालचा गोलरक्षक रुई पॅट्रीसियो व बचावफळीने त्यांचे प्रयत्न उधळून लावले. पूर्ण वेळेत सामन्यात २-० अशी आघाडी कायम राहिली.
 
रोनाल्डोची विक्रमाशी बरोबरीयुरो चषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी रोनाल्डोने बरोबरी केली. फ्रान्सचा मायकल प्लॅटिनी याने १९८४ मध्ये या स्पर्धेत पाच सामन्यात ९ गोल केले होते. रोनाल्डोने २० सामन्यात ९ गोल करत या विक्रमाशी बरोबरी केली.