शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मुंबई मॅरेथॉमध्ये इथियोपियाचा झेंडा फडकला, भारतीय गटामध्ये सेनादलाचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 14:29 IST

मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या १५व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले.

- रोहित नाईक

मुंबई : मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेल्या १५व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले. त्याचवेळी, भारतीय गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी पुरुषांमध्ये, तर महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग आणि महाराष्ट्राच्या ज्योती गवते यांनी अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. 

रविवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु झालेल्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये यंदा वातावरणाचा मोठा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला. विशेष म्हणजे विदेशी धावपटूंसह  भारतीय धावपटूंनाही उष्ण वातावरणाचा त्रास झाल्याने कामगिरीवर परिणाम झाल्याची प्रतिक्रीया सर्वच धावपटूंनी दिली. मुख्य मॅरेथॉन एलिट गटातील प्रमुख चार खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीनुसार यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये नवा विक्रम नोंदवला जाईल, अशी खात्री बाळगण्यात आली होती. मात्र, उष्ण हवामानामुळे निर्धारीत वेग कायम राखण्यात धावपटू अपयशी ठरले.

मुंबई मॅरेथॉनमध्ये २०१६ साली केनियाच्या गिदोन कीपकिटर याने २ तास ८ मिनिटे ३५ सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. यंदाच्या स्पर्धेतील प्रमुख चार खेळाडूंची सर्वोत्तम वेळ प्रत्येकी २ तास ६ मिनिटांची होती. परंतु, हवामानाचा फटका बसल्याने कीपकिटरचा विक्रम कायम राहिला. यंदाच्या सत्राचे जेतेपद पटकावलेल्या इथियोपियाच्या सोलोमोन डेक्सिसा याने २ तास ९ मिनिटे ३४ सेकंदाची वेळ देत बाजी मारली. त्याचवेळी, सुमेत अकालनौ (इथियोपिया, २:१०:१०) आणि जोशुआ किपकोरिर (केनिया, २:१०:३०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. 

सोलोमोन याने सुरुवातीपासून आघाडी घेत २० किमी अंतरापर्यंत आघाडी कायम राखली होती, मात्र, यानंतर केनियाच्या किपकोरिर याने आघाडी घेतली. २५ किमी अंतरानंतर पुन्हा एकदा सोलोमोन याने आघाडी घेत अखेरपर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी धावपटूंना मागे ठेवत बाजी मारली. दुस-या स्थानासाठी किप्कोरिर याने अकलनौ याला कडवी टक्कर दिली. मात्र अखेरच्या ५०० मीटर अंतरामध्ये अकलनौ याने कमालीचा वेग वाढवत रौप्य पटकवाताना किपकोरिर याला कांस्य पदकावर भाग पाडण्यास पाडले. 

महिलांमध्ये इथियोपियाच्याच अमाने गोबेना हिने २ तास २५ मिनिटे ४० सेकंदाची विजयी वेळ नोंदवताना गतविजेत्या केनियाच्या बोर्नेस कितूर (२:२८:४८) हिला रौप्य पदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. इथियोपियाच्याच शुको गेनेमो (२:२९:४१) हिने कांस्य पदकावर नाव कोरले. पुरुष व महिला गटातील विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी ४२ हजार डॉलरच्या रोख रक्कमेने गौरविण्यात आले. भारतीय गटामध्ये ‘सेनादल’चा दबदबाभारतीय धावपटूंच्या पुरुष गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी अपेक्षित कामगिरी करताना एकहाती वर्चस्व राखले. गोपी थोनाकल, नितेंदर सिंग रावत या आॅलिम्पियन धावपटूंसह सेनादलच्याच श्रीनू बुगाथा यांनी अव्वल तीन स्थान पटकावताना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. यामध्ये श्रीनूने पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना आपल्या पहिल्याच प्रयत्नात पोडियम स्थान पटकावले. मात्र तरीही याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, अशी खंत त्याने व्यक्त केली. 

गोपीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारताना २ तास १६ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत वर्चस्व राखले. नितेंदर आणि श्रीनू यांनी अनुक्रमे २ तास १६ मिनिटे ५४ सेकंद आणि २ तास २३ मिनिटे ५६ सेकंद अशी वेळ नोंदवली. गोपीने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. नितेंदरने त्याला गाठण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु गोपीच्या सातत्यपूर्ण वेगापुढे त्याला अव्वल स्थान पटकावण्यात यश आले नाही. 

महिलांमध्ये ओलिम्पियन सुधा सिंगने निर्विवाद वर्चस्व राखताना २ तास ४८ मिनिटे ३२ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. सुधाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पणास लावताना गतविजेती महाराष्ट्राची धावपटू ज्योती गवते हिचे आव्हान मागे टाकले. ज्योतीला २ तास ५० मिनिटे ४७ सेकंद अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच, पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या रेल्वेच्या पारुल चौधरीने २ तास ५३ मिनिटे २६ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पटकावले.

टॅग्स :Mumbai Marathon 2018मुंबई मॅरेथॉन २०१८Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन