शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीच्या निर्णयावर समितीची स्थापना

By admin | Updated: July 19, 2015 22:17 IST

आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने दोन वर्षांची बंदी लादली.

मुंबई : आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने दोन वर्षांची बंदी लादली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीमध्ये या निर्णयावर अभ्यास करून त्याचा सहा आठवड्यांमध्ये तपशील देण्यासाठी एक आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे ठरविले आहे. दरम्यान, चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांविषयी बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या वेळी मंडळाने केवळ समिती स्थापून तूर्तास या संघाबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पूर्णपणे पालन करण्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी न्यायालयाच्या निर्णयावर काम करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या समितीतील सदस्यांची नावे सोमवारी घोषित करण्यात येतील, असेही सांगितले. सुमारे तासभर झालेल्या या बैठकीनंतर बीसीसीआयने स्पष्ट केले, की लोढा समितीच्या निर्णयाचा आम्ही आदर करून त्यांनी दिलेल्या निर्णयाचे लगेच पालन करू. देशामध्ये खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी व ती कायम राखण्यासाठी मंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आयपीएल - ९ आणखी भव्य व शानदारमाझ्यावर विश्वास दाखवून समिती स्थापन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. सहा आठवड्यांच्या कालावधीमध्ये आम्ही आमचा अहवाल सादर करून आयपीएल यापुढे कसे सुरू ठेवले जाईल, यावर निर्णय घेतला जाईल. या समितीतील सदस्यांचे नावे सोमवारी जाहीर केली जातील. या वेळी सर्व हितचिंतकांनी आपले विचार मांडले व आयपीएल सुरू राहण्याबाबत एकमत केले. आयपीएलचे ९ वे सत्र आणखी भव्य व शानदार असेल, याची मी खात्री देतो.- राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष