शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडचा पाकवर ३३० धावांनी विजय

By admin | Updated: July 26, 2016 00:57 IST

जेम्स अ‍ॅण्डरसन, मोईन अली आणि ख्रिस व्होक्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेत दुसºया कसोटीच्या चौथ्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला तब्बल ३३० धावांनी विजय मिळवून दिला.

दुसरी कसोटी : चौथ्या दिवशीच विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरीमँचेस्टर : जेम्स अ‍ॅण्डरसन, मोईन अली आणि ख्रिस व्होक्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेत दुसºया कसोटीच्या चौथ्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला तब्बल ३३० धावांनी विजय मिळवून दिला. सोमवारच्या या विजयामुळे उभय संघात १-१ अशी बरोबरी झाली. ओल्ड ट्रॅफोर्डवर विजयासाठी ५६५ धावांचा पाठलाग करताना पाकचा दुसरा डाव शेवटच्या सत्रात २३४ धावांत संपुष्टात आला. अ‍ॅण्डरसनने शान मसूद याला कर्णधार अ‍ॅलिस्टर कूककरवी पहिल्या स्लिपमध्ये झेल बाद केल्यानंतर अझहरअली याला पायचित केले.त्याआधी बेन स्टोकच्या चेंडूवर कूकने स्लिपमध्ये झेल सोडल्याने उपाहारापूर्वी युनूस खानला जीवदान मिळाले. स्टोकला एकही बळी मिळू शकला नाही. एकाकी झुंज देणारा मोहम्मद हफीज याने ४२ धावांची खेळी केली; पण पराभव वाचविण्यात त्यालाही अपयश आले. गॅरी बॅलेन्सवर मोईन अलीच्या चेंडूवर शॉर्ट लेगवर त्याचा सुरेख झेल टिपला. दुसºया टोकावर संयमी खेळणारा युनूस (२८) संघाची पडझड होत असताना एकाकी संघर्ष करीत होता. पण त्याचाही संयम सुटताच मोईनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात सीमारेषेजवळ लाँगआॅनवर अ‍ॅलेक्स हाल्सकडे त्याने झेल दिला.(वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलकइंग्लंड पहिला डाव ८ बाद ५८९ वर डाव घोषित आणि १ बाद १७३ वर डाव घोषित.(कूक नाबाद ७६, रुट नाबाद ७१) मात पाकिस्तान १९८ आणि २३४ (हफीज ४१,अ‍ॅण्डरसन ४१/३, व्होक्स ४१/३,)