शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

By admin | Updated: September 1, 2015 00:04 IST

अत्यंत रोमहर्षक झालेल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियावर ५ धावांनी विजय मिळविला. मोईन अली (नाबाद ७२) व इयान मॉर्गन (७४) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर

कार्डीफ : अत्यंत रोमहर्षक झालेल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियावर ५ धावांनी विजय मिळविला. मोईन अली (नाबाद ७२) व इयान मॉर्गन (७४) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर इंग्लंडने १८२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाला आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने ५३ चेंडूत केलेली ९० धावांची जिगरबाज खेळी करीत जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे हा सामना झाला. नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (४) व शेन वॉट्सन (८) किरकोळीत बाद झाले. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ (५३ चेंडूत ९० धावा) व ग्लेन मॅक्सवेल (३२ चेंडूत ४४ धावा) यांनी सामन्यात रंगत भरली. स्टेक्सने मॅक्सवेलला १४ व्या षटकांत बाद केले. तर ९ चेंडू शिल्लक असताना स्मिथ विलीच्या गोलंदाजीवर बिलिंग्जकडे झेल देऊन परतला. त्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. विली याने २, तर फिन, टॉप्ले, स्टोक्स व अली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. तत्पूर्वी जेजे रॉय (११), एडी हेल्स (३) या सलामवीरांना लवकर गमावल्यानंतर अली (७६ चेंडूत नाबाद ७२) व मॉर्गन (३९ चेंडूत ७२ धावा) यांच्या खेळीने इंग्लंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८२ धावा उभारल्या. पॅट कमिन्सने २, तर नॅथन कोल्टर-निल, मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)