शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेसमोर इंग्लंडचे आव्हान

By admin | Updated: December 26, 2015 02:46 IST

भारताकडून पराभूत झालेला द. आफ्रिका संघ आणि पाकिस्तानकडून मार खाणारा इंग्लंड संघ आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत

डरबन : भारताकडून पराभूत झालेला द. आफ्रिका संघ आणि पाकिस्तानकडून मार खाणारा इंग्लंड संघ आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत परस्परांपुढे येणार आहेत. दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह मालिकेत आघाडी मिळविण्याचे असेल.कसोटी क्रमवारीत नंबर वन असलेल्या द. आफ्रिकेला टीम इंडियाकडून ०-३ ने पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे इंग्लंडला पाकने यूएईत कसोटी मालिकेत ०-२ ने पराभूत केले होते. उभय संघात दिग्गज मॅचविनर्सचा भरणा असल्याने पहिला सामना जिंकून मालिकेत कशी आघाडी मिळविता येईल, यासाठी उभय संघांनी डावपेच आखले आहेत. यजमान संघ हाशिम अमलाच्या नेतृत्वात आव्हान सादर करेल. इंग्लंडची भिस्त फॉर्ममध्ये असलेल्या अ‍ॅलिस्टर कूक याच्या खांद्यावर आहे. मंद खेळपट्टीवर दोन्ही संघ ढेपाळतात हा इतिहास आहे. फिरकी माऱ्यापुढे धावा काढण्यासाठी संघर्ष करण्याची वृत्ती दोन्ही संघांच्या फलंदाजांमध्ये पहायला मिळते. पण येथे जलद आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा काढून सामना जिंकण्याचा उभय संघ प्रयत्न करतील. खराब फलंदाजीने ग्रासलेल्या द. आफ्रिका संघाला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन खेळणार नसल्याने दिलासा लाभला असावा. अ‍ॅण्डरसन मांसपेशी ताणल्या गेल्याने बाहेर आहे. द. आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मात्र दुखापतीतून सावरून संघात परतला. त्याच्या आगमनामुळे संघाची गोलंदाजी भक्कम झाली. दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश संघाने देखील दोन्ही सराव सामन्यात सुरेख कामगिरी करीत आपण कडवे आव्हान देण्यास आलो असल्याचे संकेत दिले. द. आफ्रिका संघाच्या फलंदाजीची जबाबदारी एबी डिव्हिलियर्स याच्यावर असेल. इंग्लंडसाठी धावा करण्याची मुख्य भिस्त अ‍ॅलिस्टर कूक याच्यावर राहील. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना यजमान कर्णधार अमला म्हणाला,‘ भारतातील निराशाजनक कामगिरी विसरून येथे नव्याने सुरुवात करण्यास सज्ज आहोत. त्यासाठी एक विजय हवा आहे. नव्या उत्साहाने इंग्लंडला पराभूत करू यात शंका नाही.’इंग्लंड : अ‍ॅलेक्स हेल्स, निक कॉम्पटन, ज्यो रूट, जेम्स टेलर,बेन स्टोक्स,जॉनी बेएरेस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टीव्हन फिन.