शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोर्गनच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड विजयी

By admin | Updated: May 26, 2017 03:31 IST

कर्णधार इयोन मोर्गनच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या वन डेत द. आफ्रिकेचा ७२ धावांनी पराभव

लिड्स : कर्णधार इयोन मोर्गनच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या वन डेत द. आफ्रिकेचा ७२ धावांनी पराभव करीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आफ्रिकेवर विजय नोंदवित यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळविली.विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य गाठणारा द. आफ्रिका संघ पाच षटकांआधीच ३६७ धावांत बाद झाला. हाशिम अमला आणि फाफ डु प्लेसिस यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेली ११२ धावांची भागीदारीदेखील विजय मिळवून देऊ शकली नाही. त्याआधी मोर्गन (१०७ धावा) दहावे वन डे शतक ठोकताच इंग्लंडने ६ बाद ३३९ अशी मजल गाठली. संघाचे पाच गडी १९८ धावांत बाद होऊनही मोर्गन-मोईन अली यांनी सहाव्या गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी केली. अली ७७ धावांवर नाबाद राहिला. दोघांनीही प्रत्येकी पाच षटकार मारले. अलीने नंतर दोन गडी बाद करताच त्याला सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला. (वृत्तसंस्था)स्टोक्सच्या फिटनेसची अफवा मोर्गनने फेटाळलीबेन स्टोक्सच्या फिटनेसबद्दलची अफवा कर्णधार इयोन मोर्गन याने फेटाळून लावली. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेला स्टोक्स बुधवारी येथे परतला. त्याने पहिल्या वन डेत केवळ दोनच षटके गोलंदाजी केली. यावर मोर्गन म्हणाला, ‘स्टोक्स फिटनेसमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याने दोन षटके टाकली, तरी सामन्यावर पकड निर्माण केल्यामुळे त्याच्या गोलंदाजीची गरज भासली नाही. आम्हाला विकेट मिळत असताना स्टोक्सला गोलंदाजी करायला लावून जोखिम पत्करायची नाही, असा मी निर्णय घेतला होता.’ स्टोक्सच्या गुडघ्यावर मागच्यावर्षी शस्त्रक्रिया झाली.