शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

इंग्लंडची भारतावर आघाडी

By admin | Updated: February 16, 2017 00:15 IST

इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ५०१ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४३१ धावांवर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला ७० धावांची आघाडी मिळाली.

नागपूर : इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ५०१ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४३१ धावांवर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला ७० धावांची आघाडी मिळाली. पाहुण्यांनी दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर एक गडी गमावून २३ धावा केल्या आहेत, हॅरी ब्रुक (१५) आणि हेन्री ब्रुक्स (०) धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत.आज गुरुवार सामन्याचा शेवटचा दिवस असून, उभय संघांचा एक डाव शिल्लक असल्यामुळे सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता बळावली आहे. जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने २ बाद १५६ धावांवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. नाबाद फलंदाज सौरभ सिंग (५३) आणि जाँटी सिद्धू (२३) हे १७६ धावांवर बाद झाले. लियाम व्हाईटने जाँटी सिद्धूचा (३३) त्रिफळा उडविला, तर हेन्री ब्रुक्सने सौरभ सिंगला ६२ धावा (१३७ चेंडू, ११ चौकार) पायचित केले. चिवट फलंदाजी करीत फेरारिओने १५१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने १७३ चेंडंूत १४ चौकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. सिजोमोन जोसेफही अर्धशतक नोंदविण्यात यशस्वी ठरला. जोसेफ ६२ धावा ९६ चेंडू, ७ चौकार आणि विनीत पन्वर (४) धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडच्या हेन्री ब्रुक्स, लियाम व्हाईट, इआॅन वुड्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही हॅरी ब्रुक व मॅक्स होल्डनने केली. कनिश सेटने होल्डनला (८) धावांवर पायचित केले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक-इंग्लंड (पहिला डाव) : ५ बाद ५०१ (डाव घोषित)भारत (पहिला डाव-२ बाद १५६ वरून पुढे) : सौरभ सिंग पायचित गो. ब्रुक्स ६२, जाँटी सिद्धू त्रि.गो. व्हाईट ३३, रविंदर ठाकूर पायचित गो. वुड्स ३१, डॅरिल फेरारिओ त्रि.गो. ब्रुक्स ११७, एस. लोकेश्वर त्रि.गो. वुड्स २२, कनिश सेठ पायचित गो. रॉलिन्स ४, सिजोमोन जोसेफ नाबाद ६२,, विनीत पन्वर नाबाद ४. अवांतर-१७, एकूण १२२ षटकांत ८ बाद ४३१ डाव घोषित. गडी बाद क्रम : १-२३, २-१२०, ३-१७६, ४-१७६, ५-२६३, ६-३२३, ७-३३४, ८-३८६.गोलंदाजी : आरोन बिअर्ड १२-१-६५-१, हेन्री ब्रुक्स २४-९-७५-२, आर्थर गोडसल १३-२-४६-०, लियाम व्हाईट ३७-४-१०४-२, डेलरे रॉलिन्स १४-४-४८-१, मॅक्स होल्डन ८-०-२१-० , इआॅन वुड्स १४-२-५५-२. इंग्लंड (दुसरा डाव) : हॅरी ब्रुक खेळत आहे १५, मॅक्स होल्डन पायचित गो.सेठ ८, हेन्री ब्रुक्स खेळत आहे ०. अवांतर-०, एकूण-९ षटकांत १ बाद २३. गडी बाद क्रम : १-२३. गोलंदाजी : कनिश सेठ ४-३-८-१, रिषभ भगत २-१-८-०, डॅरिल फेरारिओ १-०-३-०, विनीत पन्वर १-०-३-०, सिजोमोन जोसेफ १-०-१-०.