शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

इंग्लंडची आॅस्ट्रेलियावर मात

By admin | Updated: September 12, 2015 03:23 IST

ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली आणि मॅथ्यू वेड यांच्या आक्रमक खेळीने आॅस्ट्रेलियाने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी उभारलेले ३०० धावांचे तगडे

लीड्स : ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली आणि मॅथ्यू वेड यांच्या आक्रमक खेळीने आॅस्ट्रेलियाने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी उभारलेले ३०० धावांचे तगडे लक्ष्य इंग्लंडने तिथे ठरविले. इयोन मोर्गनची ९२ धावांची आश्वासक खेळी व त्याला बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली यांनी दिलेल्या सुरेख साथीने इंग्लंडने ३ गडी व १० चेंडू राखून ३०४ धावा टोलवून विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे. हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ बाद २९९ धावा केल्या. विजयासाठी ३०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य घेऊन उतरलेल्या इंग्लंडला दुसऱ्याच षटकांत अ‍ॅलेक्स हेल्स (०) याच्या रूपाने झटका बसला. त्यामुळे १ बाद १ अशी स्थिती झाली. मात्र, सलामीवीर जॅसन रॉय (३६) व मोर्गन (९२) यांनी डाव सावरून दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. मोर्गनने ९२ चेंडंूत ८ चौकार व २ षटकारांच्या साह्याने खेळी साजरी केली. टेलर ८९ धावांवर बाद झाला. मात्र, मधली फळी व तळाच्या फलंदाजांनी आपली भूमिका पार पाडून विजयात वाटा उचलला. स्टोक्स (४१), बेअरस्टो (३१), मोईन अली (नाबाद २१), लियाम प्लंकेट (१७) व डेव्हीड विली (नाबाद १२) यांनी मोक्याच्या क्षणी धावा केल्या.तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने अवघ्या ६४ चेंडूंतच १० चौकार आणि २ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २९९, ग्लेन मॅक्सवेल ८५, बेली ७५, वॅडे नाबाद ५०, जॉन हास्टिंग नाबाद ३४, डेव्हिड विली ३/५१, मोईन अली २/४०, प्लंकेट २/४७ पराभूत.वि इंग्लंड : ४८.२ षटकांत ७ बाद ३०४, जॅसन रॉय ३६, जेम्स टेलर ४१, इयोन मोर्गन ९२, बेन स्टोक्स ४१, जॉनी बेअरस्टो ३१, मोईन अली नाबाद २१, डेव्हिड विली नाबाद १२.