शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीचे आव्हान संपुष्टात?

By admin | Updated: April 30, 2017 05:39 IST

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के खाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला आज, शनिवारी येथे झालेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपर

- विश्वास चरणकर,  पुणे

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के खाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला आज, शनिवारी येथे झालेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपर जायंट संघाने ६१ धावांनी हरवले. या पराभवाने बँगलोर संघाचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणे संघाने ३ बाद १५७ धावा केल्या, पण आरसीबीला हे आव्हानही पेलेले नाही. त्यांनी निर्धारीत २0 षटकांत ९ बाद ९६ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देताना ५५ धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. बँगलोर संघ सलग दोनदा सर्वबाद झाला होता, परंतु या सामन्यात त्यांनी ९ गडी गमावले ही एकमेव त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली. सात धावांत २ बळी घेणाऱ्या पुणे संघाच्या ल्युकी फर्ग्युसनला सामनावीरचा पुरस्कार देणात आला.पुणे संघाला माफक धावांत गुंडाळल्यानंतर विराट सेनेला आज सामना जिंकून आव्हान जिवंत ठेवण्याची संधी होती परंतु त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे त्यांनी ती गमावली. पुणे संघाच्या शिस्तबध्द आणि भेदक माऱ्यापुढे आरसीबी ९६ धावापर्यंत मजल मारु शकले, विराट कोहली (४८ चेंडूत ५५ धावा) वगळता आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. पुण्याकडून इम्रान ताहिरने ३ तर ल्युकी फर्ग्युसनने २ बळी घेतले.तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल जिंकण्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याला यश आले, त्याने यजमान संघास फलंदाजीस पाचारण करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या (६) रुपाने पुण्याने पहिला बळी गमावला. त्याचा जोडीदार राहुल त्रिपाठी मात्र नेहमीच्या आक्रमक मूडमध्ये होता. कर्णधार स्मिथने एक बाजू लावून धरुन त्याला फलंदाजीची मोकळीक दिली. पाचवे षटक घेवून आलेल्या एस अरविंदच्या पहिल्याच चेंडूला त्रिपाठीने लाँग आॅनच्या डोक्यावरुन प्रेक्षकांत भिरकावून दिले. दोघांनी सातव्या चेंडूवर संघाचे अर्धशतक फलकावर लावले. पण त्यानंतर पवन नेगीने त्रिपाठीला बाद आरसीबीला थोडी उसंत मिळवून दिली. कर्णधार स्मिथने ४५ धावा करुन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्याला स्टुअर्ट बिन्नीने बाद केले. राहुल आणि स्मिथ यांची जमलेली जोडी फुटल्यानंतर मनोज तिवारी आणि महेंद्र सिंग धोनी यांनी ती कसर भरुन काढली. चौथ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ४९ धावा जोडल्याने पुण्याचा स्कोर २0 षटकात ३ बाद १५७ असा आव्हानात्मक दिसू लागला.आरसीबी शंभरात बाद- २९ एप्रिल २०१७ रोजी पुणे येथे सुपर जायंटविरुद्ध ९ बाद ९६- २३ एप्रिल २०१७ रोजी कोलकाता येथे केकेआरविरुद्ध ४९ धावांत गारद- २६ एप्रिल २०१४ रोजी अब धाबी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७० धावांत डाव संपुष्टात.- २0 एप्रिल २००९ रोजी पोर्ट एलिजाबेथ येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ८७ धावांत संघ गारद.- १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरू येथे केकेआरविरुद्ध सर्वबाद ८२.संक्षिप्त धावफलक : पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे झे. मिल्ने गो. बद्री ६, राहूल त्रिपाठी झे. जाधव गो. नेगी ३७, स्टीव्हन स्मिथ झे. मिल्ने गो. बिन्नी ४५, मनोज तिवारी नाबाद ४४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २१; अवांतर ४, एकूण २० षटकांत ३ बाद १५७; गोलंदाजी : मिल्ने ४-०-३५-०, बद्री ४-०-३१-१, अरविंद ४-०-३०-०, चाहल २-०-२५-० , नेगी ४-०-१८-१, बिन्नी २-०-१७-१ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : ट्रॅव्हीस हेड त्रिफळा गो. उनाडकट २, विराट कोहली झे. बदली खेळाडू अगरवाल गो. ख्रिस्तीयन ५५, ए बी डिव्हीलियर्स झे. तिवारी गो. फर्ग्युसन ३, केदार जाधव धावचित (फर्ग्युसन / धोनी) ७, सचिन बॅबी झे. स्मिथ गो. वॉशिंग्टन २, स्टुअर्ट बिन्नी झे. वॉशिंग्टन गो. फर्ग्युसन १, पवन नेगी झे. ख्रिस्तीयन गो. ताहीर ३, अ‍ॅडम मिल्ने झे. स्मिथ गो. ताहिर ५, सॅम्युअल बद्री त्रिफळा गो. ताहिर २, श्रीनाथ अरविंद नाबाद ८, यजुवेंद्र चाहल नाबाद ४; अवांतर ४, एकूण २० षटकांत ९ बाद ९६; गोलंदाजी : चाहर २-०-१८-०, उनाडकट ४-०-१९-१, फर्ग्युसन ४-१-७-२, ख्रिस्तियन ४-०-२५-१, ताहिर ४-०-१८-३, वॉशिंग्टन २-०-७-१