शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवट शानदार करायचा आहे - सीमा पूनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:42 IST

सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.

नवी दिल्ली : सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सीमा ही भारताची सर्वात यशस्वी अ‍ॅथलिट म्हणून गणली जाते. तिने जेव्हा-जेव्हा या स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हा तिने पदक जिंकले आहे. सीमाने सर्वात आधी मेलबर्न २00६ मध्ये सहभाग घेतला तेव्हा रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तिने २0१0 आणि २0१४ मध्येदेखील पदकांची कमाई केली. आता ती ३४ वर्षांची आहे आणि असे असले तरी ती गोल्डकोस्टमध्ये होणाºया स्पर्धेत पदक जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे.सीमाने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत तीन आॅलिम्पिक (२0१४, २0१२ आणि २0१६), एक आशियाई स्पर्धा (२0१४) आणि तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. तिचे लक्ष आता २0२0 च्या आॅलिम्पिककडेही लागून राहिले आहे.सीमा सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. ती म्हणाली, ‘ही माझी चौथी राष्ट्रकुल स्पर्धा असेल आणि मी गोल्डकोस्टमध्ये पदक जिंकू शकते याचा मला पूर्ण विश्वास आहे. तथापि, पदकाचा रंग कोणता असेल हे मी सांगू शकत नाही. हा माझ्यासाठी प्रदीर्घ प्रवास आहे. २0२0 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकेल की नाही हे मला माहीत नाही; परंतु मी २0२0 आॅलिम्पिकपर्यंत खेळात असणार आहे. माझी कारकीर्द अद्याप संपलेली नाही.’(वृत्तसंस्था)२0२0 आॅलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास..!हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खेवडा येथे जन्म झालेल्या सीमा हिने ११ व्या वर्षीच अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रवेश केला होता. तिने वयाच्या १७ व्या वर्षी विश्व ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये थाळीफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते; परंतु डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे तिचे हे पदक हिसकावून घेण्यात आले होते.’ सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी सीमाने स्युडोफेडरिन सेवन केले होते.तेव्हा आयएएएफच्या नियमानुसार तिला ताकीद देऊन सोडण्यात आले. आॅलिम्पिक २0१२ आणि २0१६ मध्ये ती पात्रता फेरीमध्येच बाद झाली. त्याची खंत तिच्या मनात आजही घर करून आहे. ती म्हणाली, ‘मला माझ्या कारकीर्दीविषयी विशेष खंत नाही; परंतु आॅलिम्पिकमधील अपयश हे मला अजूनही जिव्हारी लागले आहे. त्यामुळे मी २0२0 आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊन तेथे चांगली कामगिरी करू इच्छिते.’

टॅग्स :Sportsक्रीडा