शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: March 12, 2016 03:13 IST

भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह बी. साई प्रणीत, के. श्रीकांत, क्वालीफायर खेळाडू समीर यांना आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

बर्मिंघम : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह बी. साई प्रणीत, के. श्रीकांत, क्वालीफायर खेळाडू समीर यांना आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. सायनाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चिनी तैपेईच्या तेई जू यिंग हिच्याकडून ४० मिनिटांच्या लढतीत २१-१५, २१-१६ अशी मात खावी लागली. यिंगकडून सायनाचा हा सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वीच्या चारही लढतीत यिंगनेच बाजी मारली होती. गैरमानांकित प्रणीतला पुरुष गटातील एकेरीच्या दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या हांग क्रिस्टीयन विटीघस याच्याकडून १ तास आणि ४ मिनिटांपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत १२-२१, २१-११, २१-१६ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या खेळाडूने पहिल्या फेरीत मलेशियाच्या चोंग वेईला धूळ चारून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अन्य लढतीत के. श्रीकांत याला जपानच्या चौथे मानांकनप्राप्त केंतो मोमोता याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत मोमोता याने अवघ्या ३१ मिनिटांत १०-२१, १३-२१ असा विजय मिळवीत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या दोन्ही खेळाडूंतील हा ९ वा सामना होता. यापैकी जपानच्या या खेळाडूने सहा सामने आपल्या नावे केले आहेत. दरम्यान, प्रणीत याने डेन्मार्कच्या खेळाडूविरुद्ध सुरुवातीला उत्कृष्ट खेळ केला. याच बळावर त्याने हा गेम २१-१२ असा जिंकला होता. मात्र, पुढच्या दोन्ही गेममध्ये त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अन्य एका क्वालिफायर लढतीत भारताच्या समीरला चीनच्या तियान हाऊवेईकडून २१-१०, १२-२१, १९-२१ अशी मात खावी लागली. (वृत्तसंस्था)