शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ेॅेललिता बाबरला सुवर्ण ...

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महिलांना रग्बी, कबड्डीमध्ये रौप्य, जयश्री, अंकिता, सचिन, श्रावणी, पुरुष रिलेमध्ये कास्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महिलांना रग्बी, कबड्डीमध्ये रौप्य, जयश्री, अंकिता, सचिन, श्रावणी, पुरुष रिलेमध्ये कास्य
तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १३ व्या दिवशी महाराष्ट्र संघाला एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्यपदकांवर समाधान मानावे लागले.
ॲथलेटिक्स : महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात इचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेती ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून वर्चस्व राखत आघाडी घेतली होती. तिने ही शर्यत ९ मिनिटे ४२.६३ सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या संघाला या
क्रीडाप्रकारातील शेवटचे सुवर्ण जिंकून दिले. याच प्रकारात जयश्री बोरगीने शर्यत १० मि. ०४.३० से. पूर्ण करून कास्य तर पुरुषांच्या याच क्रीडाप्रकारात सचिन पाटीलने ९ मि. ००.२७ सेकंदाची वेळ नोंदवून कास्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये लियोन टी., सनी पाटील, दत्ता झोडगे व किरण डोइफोडे यांच्या जिगरबाज पळतीमुळे आपल्या संघाला कास्यपदक जिंकून दिले.
कबड्डी : महाराष्ट्राच्या महिला संघाना अंतिम फेरीत हरियानाकडून १७-२० गुणांनी पराभव पत्करावा लागला. लढतीच्या शेवटच्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या महिलांनी आतताईपणा केल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून सायली केरीपाळे, सुवर्णा बारटक्के, मीनल जाधव, अभिलाषा म्हात्रे व स्नेहल शिंदे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला.
* तायक्वाँदो : महाराष्ट्राच्या अंकिता पाटीलने ४९ किलो गटात कास्यपदक जिंकले.
* वुशू : महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने जियान वुशू प्रकारात ७.०३ गुण संपादन करून कास्यपदक जिंकले.
* रग्बीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला अंतिम फेरीत ५-१७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
==================================================
(वृत्तसंस्था)
=====================================
०००००