मेलबोर्न : मायकल क्लार्क (६४), अॅरोन फिंच (६१), स्टीव्हन स्मिथ (५९) यांच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या बळावर आॅस्ट्रेलियाने वर्ल्डकपपूर्वी झालेल्या सराव सामन्यात संयुक्त अरब अमिरातवर (यूएई) १८८ धावांनी विजय मिळविला़ आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले़ प्रत्युत्तरात यूएई संघ ३०़१ षटकांत अवघ्या ११६ धावांत बाद झाला़ आॅस्ट्रेलियाकडून क्लार्कने आपली फिटनेस सिद्ध करताना ६१ चेंडूंत ८ चौकार लगावले, तर फिंच याने आपल्या खेळीत ६८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकार खेचले़ स्थिमने ५१ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार आणि १ षटकार खेचला़ या व्यतिरिक्त शेन वॉटसन याने ३४ आणि जॉर्ज बेली याने ४६ धावांची खेळी केली़ यूएईकडून कृष्णा चंद्रन आणि नासिर अजीज यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले़ यूएईकडून यष्टिरक्षक फलंदाज स्वप्निल पाटीलने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली़ तर सलामीवीर फलंदाज अमजद अलीला २१ धावांचे योगदान दिले़ (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाची यूएईवर सहज मात
By admin | Updated: February 12, 2015 02:10 IST