मुंबई : आय लीगच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांसमोर खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जय - पराजय हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम खेळ करु, असे मिनर्व्हा अॅकॅडमी फुटबॉल क्लबचा कर्णधार सीमरनजीत सिंगने ‘लोकमत’ला सांगितले. तो पुढे म्हणाला, केंकरे एफसी बलवान असुन त्यांच्या विरुद्ध गुरुवारी होणारा सामना चुरशीचा ठरेल. चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आयोजित आय-लीग दुसऱ्या श्रेणीच्या सामन्यात चंदिगड येथील मिनर्व्हा अॅकडमी आणि केंकरे फुटबॉल संघ यांच्यात भिडत होईल. चंदिगडमध्ये आम्ही गवताच्या मैदानावर सराव करतो. मुंबईतील सामना टर्फवर होणार असल्याने थोडी अडचण होऊ शकते. मात्र आमच्या खेळाडूंनी परिस्थितीशी जळवून घेताना कसून सराव केला आहे. संघाच्या गोलरक्षकाची जबाबदारी बंगालमधील श्यान रॉय याच्याकडे आहे. शिवाय संघात पंजाब, दिल्ली मधील खेळाडूंचा समावेश असल्याने आम्ही उत्तर भारताचे प्रतिनिधित्व करतोय, असे अभिमानाने मिनर्व्हा अॅकडमीचे प्रशिक्षक सुरेंद्रर सिंग यांनी सांगितले. याआधी केंकरे एफसीने काश्मिर विरुद्धचा सामना अनिर्णित राखला. विजायची संधी असताना स्ट्रायकरला प्रभावी कामगिरी करता आली नाही, याची कबुली मुख्य प्रशिक्षक समीर पठाण यांनी दिली. पण मिनर्व्हा विरुद्ध सर्व कसर भरुण काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मिनर्व्हाचा पहिलाच सामनाआय लीग स्पर्धेत केंकरे एफसीने काश्मिर एफसी विरुद्ध सामना अनिर्णीत राखून एका गुणासह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. तर मिनर्व्हा एफसी आज पहिलाच सामना खेळत असल्याने त्यांच्यासमोर विजयी सुरुवात करण्याचे लक्ष्य असेल.
मुंबईमध्ये प्रथमच खेळण्यास उत्सुक
By admin | Updated: November 19, 2015 00:53 IST