शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

द्विवेदी-चावला यांनी दमवले

By admin | Updated: November 10, 2015 02:03 IST

एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी

मुंबई : एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५० धावांची मजल मारली. मुंबईने उभारलेल्या ६१० धावांचा पाठलाग करणारा उत्तर प्रदेश संघ २६० धावांनी पिछाडीवर असून, फॉलोआॅन टाळण्यासाठी त्यांना अजूनही १११ धावांची गरज आहे, तसेच एकूणच फलंदाजांचे वर्चस्व राहिलेला हा सामना अनिर्णितकडे झुकला असून, मंगळवारी मुंबईकर उत्तर प्रदेशवर फॉलोआॅन देण्याचा जोरदार प्रयत्न करतील.वानेखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशने बिनबाद ५१ या धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. तन्मय श्रीवास्तव बलविंदर संधूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. अर्धशतक झळकावल्यानंतर शर्मा लगेच धावबाद होऊन परतला. यानंतर आलेल्या कर्णधार सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अवघ्या ९ धावा काढून तो दाभोळकरचा शिकार ठरला. यानंतर असनोराही सर्वाधिक ९२ धावा काढून बाद झाला. यावेळी मुंबईकर वर्चस्व गाजवणार असे दिसत असताना, सरफराज खान या ‘माजी मुंबईकर’ने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली. खेळपट्टी व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या माहितीचा फायदा घेत, सरफराजने ४ चौकार व २ षटकार खेचत ५१ चेंडूत ४४ धाव फटकावल्या. अभिषेक नायरने त्याला पायचीत करुन मुंबईतील अडसर दूर केला. ५ बाद २४६ अशा अडचणीत असलेल्या उत्तर प्रदेशला मुंबईकर किती धावांत गुंडाळणार अशी उत्सुकता असताना द्विवेदी आणि चावला यांनी मुंबईकरांना यानंतर यश मिळवून दिले नाही.या दोघांनीही शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करून सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी केली. द्विवेदी ८८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ५० धावांवर, तर चावला ५५ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५४ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईकडून अष्टपैलू अभिषेक नायरने ३७ धावांत २ बळी घेतले असून, विशाल दाभोळकर आणि बलविंदर संधू यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावाउत्तर प्रदेश (पहिला डाव) : तन्मय श्रीवास्तव त्रि. गो. संधू ३७, हिमांशू असनोरा त्रि. गो. नायर ९२, उमंग शर्मा धावबाद (कुलकर्णी) ५३, सुरेश रैना यष्टिचित तरे गो. दाभोळकर ९, सरफराज खान पायचीत गो. नायर ४४, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ५०, पीयूष चावला खेळत आहे ५४. अवांतर - ११. एकूण : ११७ षटकांत ५ बाद ३५० धावा.गोलंदाजी : विशाल दाभोळकर २६-६-१००-१, शार्दुल ठाकूर १७-३-५१-०; धवल कुलकर्णी १९-५-५५-०; बलविंदर संधू २४-७-५४-१; अभिषेक नायर १८-५-३७-२, रोहित शर्मा १३-३-४३-०