शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुुखापतग्रस्त धवनची श्रीलंका दौऱ्यातून माघार

By admin | Updated: August 17, 2015 22:57 IST

फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला हेअरलाईन फॅॅ्रक्चरमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली

दुुखापतग्रस्त धवनची श्रीलंका दौऱ्यातून माघारकोलंबो : फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला हेअरलाईन फॅॅ्रक्चरमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. धवन श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना ६३ धावांनी गमवावा लागला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून सारा ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. बीसीसीआयने प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीने स्पष्ट केले, की सलामीवीर शिखर धवन श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. गॅले कसोटी सामन्यादरम्यान धवनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतरच त्याच्या दुखापतीची चाचणी घेण्यात आली असून, हेअरलाईन फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला वेळ लागेल.पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या धवनला पहिल्या स्लिपमध्ये झेल टिपण्यात अपयश आले, त्या वेळी ही दुखापत झाली. हातावर सूज असताना तो खेळला. या दुखापतीमुळे धवनला चौथ्या दिवशी नैसर्गिक खेळ करता आला नाही. त्याला सुरुवातीला ३६ चेंडूंमध्ये आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली नाही. त्याला ड्राईव्ह करताना दुखापतीचा त्रास जाणवत होता. भारतीय संघ सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे अडचणीत सापडला आहे. दुसरा सलामीवीर फलंदाज मुरली विजय स्नायूच्या दुखापतीतून सावरत आहे. संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले, की फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दुखापतीतून सावरत आहे; पण त्याच्या फिटनेसबाबत अंतिम निर्णय दुसरा कसोटी सामना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी घेण्यात येईल. सध्या भारतीय संघाकडे एकमेव स्पेशालिस्ट फलंदाज लोकेश राहुल आहे, तर चेतेश्वर पुजाराला भारतातर्फे काही सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे. पुजाराने अलीकडे राहुलच्या साथीने चेन्नईमध्ये भारत ‘अ’ संघातर्फे आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध डावाची सुरुवात केली होती. स्टुअर्ट बिन्नीची रविवारी १६ वा सदस्य म्हणून संघात निवड करण्यात आली, पण आता धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात १५ खेळाडूंच आहेत. संघ व्यवस्थापनाने अद्याप धवनच्या पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही. निवड समितीचे दोन सदस्य विक्रम राठोड व साबा करीम संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहेत. (वृत्तसंस्था)