ऑनलाइन लोकमत
इंचियोन,दि. ३ - आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कबड्डी संघापाठोपाठ पुरूषांनीही सुवर्ण पदक पटकावले आहे. पुरूष कबड्डी संघाने इराणचा पराभव करत सलग सातव्यांदा सुवर्ण पदक पटाकवले असून आता भारताच्या खात्यात ११ सुवर्ण पदके आहेत.
पुरूष कबड्डी संघाने इराणचा अंतिम फेरीत २७-२५ असा पराभव केला आणि सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकले. तत्पूर्वी भारतीय महिला संघानेही इराणचा ३१-२१ असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. दस-याच्या शुभ दिवशी भारताला दोन सुवर्ण पदके मिळाली असून आता ११ सुवर्ण, ९ रौप्य व ३७ कांस्य पदकांसह एकूण ५७ पदके भारताच्या खात्यात जमा झाली आहेत.