शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वॉन ऐस प्रकरणामुळे आजी-माजी खेळाडू स्तब्ध

By admin | Updated: July 21, 2015 09:12 IST

भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याला केवळ पाच महिन्यांच्या कालावधी उलटला असताना पॉल वॉन एस यांच्या पदावर

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याला केवळ पाच महिन्यांच्या कालावधी उलटला असताना पॉल वॉन एस यांच्या पदावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या डच प्रशिक्षकाची अनुपस्थिती २०१६च्या आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अडथळा ठरू शकते, असे मत आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.वॉन एस यांनी हिमाचल प्रदेशातील शिलारूमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षक शिबिराला नियोजित वेळी उपस्थिती नोंदविली नाही. त्यांची प्रशिक्षकपदी राहण्याची इच्छा नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण बेल्जियममध्ये आयोजित विश्व हॉकी लीग सेमी फायनलमधील संघाच्या कामगिरीचा अहवाल त्यांनी अद्याप सादर केलेला नाही. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सणकी स्वभावाचे वॉन एस यांचा विश्व लीग सेमी फायनलमध्ये मलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यासोबत वाद झाला होता. सामन्यानंतर बत्रा मैदानात दाखल झाले आणि खेळाडूंसोबत चर्चा करीत होते. वॉन एस यांनी त्यांना रोखले व बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे बत्रा नाराज झाले.एक सिनिअर खेळाडू म्हणाला, ‘‘प्रशिक्षक बदलला तर आमच्या तयारीवर निश्चितच परिणाम होईल. त्यामुळे सराव, कामगिरी आणि रियो आॅलिम्पिकच्या तयारीवर प्रभाव पडेल. खेळाडूंना प्रशिक्षकासोबत ताळमेळ साधण्यासाठी वेळ लागतो. वेळोवेळी मुख्य प्रशिक्षकामध्ये बदल झाला तर कामगिरी निश्चितच प्रभावित होईल.’’हा खेळाडू पुढे म्हणाला, ‘‘टेरी वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ दीड वर्ष सराव केला. आम्हाला त्यांच्या शैलीची सवय झाली होती. (वृत्तसंस्था)