शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिंग प्रकरणामुळे दुती पुन्हा चर्चेत

By admin | Updated: July 5, 2017 01:46 IST

भुवनेश्वरमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू दुती चंदला सहभागी होण्यास एक दिवसाचा

नवी दिल्ली : भुवनेश्वरमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू दुती चंदला सहभागी होण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना आयएएएफने तिच्याविरुद्ध ‘लिंग’ प्रकरणात पुन्हा क्रीडा लवादाकडे (कॅस) जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आयएएएफने आपल्या वादग्रस्त हायपरअँड्रोजेनिज्म नीतीच्या समर्थनार्थ अधिक साक्ष-पुरावे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा लवादाने २७ जुलै २०१५ रोजी दुती व भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघादरम्यानच्या (आयएएएफ) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अंतरिम आदेश देताना विश्व संस्थेचा हायपरअँड्रोजेनिज्म नियम दोन वर्षांसाठी स्थगित केला होता. हायपरअँड्रोजेनिक महिला खेळाडूला सामान्य टेस्टोस्टेरोनचा (पुरुष हार्मोनचा स्तर) कामगिरीमध्ये किती लाभ होतो, हे सिद्ध करण्यासाठी आयएएएफला संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कॅसने दोन वर्षांपूर्वी अंतरिम आदेशामध्ये दुतीचे अपील आंशिक रूपाने स्वीकार केले होते आणि अंतिम निर्णय होईपर्यंत तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. आयएएएफने मंगळवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या स्थगित करण्यात आलेल्या हायपरअँड्रोजेनिज्म नियमांबाबत तयार करण्यात आलेला अहवाल प्रकाशित झाला असून २७ जुलै रोजी संपणाऱ्या दोन वर्षांच्या निर्धारित मुदतीपूर्वी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालानुसार उच्च टेस्टोस्टेरोनची पातळी असलेल्या महिला खेळाडूला कमी टेस्टोस्टेरोनची पातळी असलेल्या महिला खेळाडूंच्या तुलनेत १.८ टक्के ते ४.५ टक्के अधिक लाभ होतो. एएफआयने आयएएएफच्या हायपरअँड्रोजेनिज्म नीतीनुसार २०१४ मध्ये २१ वर्षीय दुतीला अपात्र घोषित केले होते. कारण तिची टेस्टोस्टेरोनची पातळी सामान्य पातळीच्या तुलनेत अधिक होती. दुतीने या नियमांना व तिला निलंबित करण्याच्या एएफआयच्या निर्णयाला सप्टेंबर २०१४ मध्ये आव्हान दिले होते. कॅसमध्ये अपील व सुनावणीसाठी क्रीडा मंत्रालयाने दुतीला आर्थिक सहकार्य केले होते. (वृत्तसंस्था)कॅसमध्ये प्रकरण मिटेपर्यंत स्थगित राहतीलआयएएएफने पुन्हा एकदा हे प्रकरण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व संस्थेच्या हायपरअँड्रोजेनिज्म नीतीविरुद्ध दुतीचे अपील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारत आणि विदेशामध्ये अनेक मानवाधिकार कार्यकत्यांनी हे ‘लिंगभेदा’चे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. हायपरअँड्रोजेनिज्म नियम कॅसमध्ये प्रकरण मिटेपर्यंत स्थगित राहतील, असे आयएएएफने स्पष्ट केले आहे. विश्व महासंघाने खेळाच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये धाव घेतली असली तरी आॅगस्टमध्ये लंडन येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही.