शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन पुरस्कारातून डावलल्याने गौरवचे समितीवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:33 IST

मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.

नवी दिल्ली : मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.आशिया पॅसिफिक रॅलीचा दोनदा चॅम्पियन राहिलेला गौरव म्हणाला, ‘गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्ला सरकार मान्यता देत असेल तर शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मोटर रेसिंगसारख्या खेळाला ओळख का मिळत नाही. गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्मधील खेळाडूंचा मी सन्मान करतो; पण हे तिन्ही खेळ पूर्ण स्वरूपात खेळ नाहीत, असे माझे प्रांजळ मत आहे.’मोटर स्पोर्टस्ला सरकारने मान्यता दिल्यास मोठा लाभ होईल, असे सांगून ३५ वर्षांचा गौरव पुढे म्हणाला, ‘या खेळात करियर करणाºया युवकांची संख्या वाढावी यासाठी सरकारने खेळाला अर्जुन पुरस्कार जाहीर करायला हवा. क्रीडा मंत्रालयाने मोटर स्पोर्टस् फेडरेशन आणि मोटर स्पोर्टस् क्लब आॅफ इंडियाला अधिकृत मान्यता द्यावी.’ २०१० मध्ये या खेळातील नरेन कार्तिकेयनला अर्जुन पुरस्कार देण्यात आल्याचे स्मरण गौरवने करून दिले. अर्जुन पुरस्कारासाठी आशियाई, राष्टÑकुल तसेच आॅलिम्पिकमध्ये सहभागी खेळांच्या खेळाडूंचाच विचार केला जातो. (वृत्तसंस्था)क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश नाही; पण लोकप्रियतेच्या आधारे या प्रकाराचे खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरतात. याकडे लक्ष वेधून गौरव पुढे म्हणाला,‘एखादा क्रिकेटपटू कधी कधी चांगली कामगिरी करीत हा पुरस्कार जिंकतो. ही अन्य खेळाडूंची अवहेलना ठरते. माझ्या खेळात मी जगातील अतिशय उत्कृष्ट खेळाडूंसोबत चढाओढ करीत असूनही मला पाठिंबा मिळताना दिसत नाही.- गौरव गिल, मोटर स्पोर्टस् स्टार